रमेश चोपडे Canva
सोलापूर

एका भाषणाने मिळाली आयुष्याला कलाटणी! आज रमेश चोपडे आहेत...

एका भाषणाने मिळाली आयुष्याला कलाटणी! आज रमेश चोपडे आहेत...

अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

कॉलेज जीवनात एका अधिकाऱ्याच्या भाषणामुळे प्रेरित होऊन, आपण देखील अधिकारी होऊ शकतो, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली अन्‌ जीवनाला कलाटणी मिळाली.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : दरवर्षी स्पर्धा परीक्षेत (Competitive exams) यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा (Success Story) ऐकून कित्येकजण स्पर्धा परीक्षांकडे आकर्षित होतात; परंतु मोजकेच यशस्वी होतात. त्यातीलच माढा (Madha) तालुक्‍यातील रोपळे (कव्हे) चे सुपुत्र रमेश नागनाथ चोपडे (Ramesh Chopde) हे एक म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कॉलेज जीवनात एका अधिकाऱ्याच्या भाषणामुळे प्रेरित होऊन, आपण देखील अधिकारी होऊ शकतो, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली अन्‌ जीवनाला कलाटणी मिळाली. त्यामुळेच शिक्षक, पोलिस उपनिरीक्षक, वित्त व लेखा अधिकारी ते पोलिस उपअधीक्षक अशा विविध पदांना गवसणी घालत आज ते चाळीसगाव येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

रमेश चोपडे यांच्या घरची परिस्थिती तशी मध्यम स्वरूपाची. आई, वडील दोघेही शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. सातवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यांनतर बार्शीतील जगदाळे मामांच्या महाराष्ट्र बोर्डिंग हायस्कूलमधून दहावीचे तर बारावीचे तिथेच शिवाजी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच प्रशासकीय कार्याबद्दल प्रचंड आवड. त्यात खाकी वर्दीबद्दल तर वेगळाच आनंद. आपणही असे फौजदार व्हावे, अशी त्यांची इच्छा व्हायची. ही इच्छा खऱ्या अर्थाने सत्यात साकारली ती उपजिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या निवडीनंतर, त्यांच्या भाषणामुळे.

एमपीएससीतून (MPSC) बार्शीतील अमोल यादव (मूळचे माढा) हे राज्यात पहिले आले होते. त्यांच्या निवडीमुळे आपणही अधिकारी होऊ शकतो, असा दांडगा आत्मविश्वास रमेश चोपडे यांच्यामध्ये निर्माण झाला. नुकतेच बारावीचे शिक्षण पूर्ण झाले होते. ऍग्रीला प्रवेश घेतला की, स्पर्धा परीक्षा करणे सोईस्कर होते म्हणून डीएडबरोबर ऍग्रीच्या प्रवेशासाठी देखील अर्ज केला. परंतु अगोदर डीएडला प्रवेश मिळाला. नंतर ऍग्रीसाठी संधी आली. पण डीएडला भरलेली फी परत मिळत नसल्याने, परिस्थिती नाइलाजाने का होईना डीएड करावे लागले. त्यानंतर लगेच प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. परंतु अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांना शांत बसू देत नव्हते. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातून बहिस्थ शिक्षण सुरू ठेवले अन्‌ स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी मिळेल तो वेळ सार्थकी लावत अभ्यासात सातत्य ठेवले. या परीक्षांसाठी कोणत्याही शिकवणीची गरज पडली नाही. तालुक्‍यातीलच असलेले व उपजिल्हाधिकारी झालेले रामचंद्र चोबे, सचिन बारवकर, तहसीलदार हनुमंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत होते. या सर्वांच्या प्रेरणेमुळे पोलिस उपनिरीक्षकचे स्वप्न आणखी बळकट झाले होते.

मुंबई येथे शिक्षकांचे एक वर्षाचे प्रशिक्षण होते. त्यामुळे भरपूर वेळ मिळाला. त्याचा अभ्यासासाठी सदुपयोग झाला. दिवाळी असो की इतर सण, गावाकडे न जाता मित्र अंकुश चिंतामण (सध्या पोलिस निरीक्षक) यांच्या खोलीवर जाऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे. या सर्व गोष्टींचा फायदा असा झाला, की पहिल्या प्रयत्नात 2003 साली अपेक्षित असलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झाले. या यशानंतर मात्र राज्यसेवेतील विविध परीक्षा देण्याबाबत आत्मविश्वास वाढला. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षकचे प्रशिक्षण सुरू असतानाच राज्यसेवेच्या विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची मुलाखत दिली. प्रशिक्षणानंतर नाशिक येथे कार्यरत असतानाच दुसऱ्या प्रयत्नात राज्यसेवेतून वित्त व लेखा अधिकारी म्हणून निवड झाली. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक पदाचा राजीनामा देत ही नोकरी स्वीकारली व औरंगाबाद येथे हजर झाले. एकापाठोपाठ एक यश संपादन करत असताना अभ्यासात मात्र कधीही खंड पडू दिला नाही. त्यामुळे जवळपास एक वर्षाच्या फरकाने नवनवीन पदांवर विराजमान होण्याचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. जसजसे या क्षेत्राबद्दल अधिक माहिती मिळत होती तसतसे नवनवीन पदे मिळत होती.

अखेर राज्यसेवेतून 2007 साली पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली. या सहा ते सात वर्षांच्या काळात इतर अनेक पदांवरील नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या, पण त्या स्वीकारल्या नाहीत. वयाचे बंधन असल्याने, पोलिस उपअधीक्षक या पदावर हजर होत नोकरी स्वीकारली. या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेचा मोठा फायदा झाला. यासाठी प्राथमिक शिक्षक धनवटे गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले. जवळपास दहा वर्षांच्या या काळात चार विविध प्रशासकीय पदांवर सेवा करण्याची संधी मिळाली. सध्या रमेश चोपडे हे पदोन्नतीने अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT