Only then will the chain of corona in Pandharpur break the need to increase the test 
सोलापूर

...तरच तुटेल पंढरपुरातील कोरोनाची साखळी; टेस्ट वाढविण्याची गरज 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व इतर लोकांची कोरोना चाचणी होण्याची गरज आहे. अधिक संख्येने कोरोना चाचण्या घेण्यात आल्या तरच कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल, असे मत शहरातील जाणकरांमधून व्यक्त केले जात आहे. 
पंढरपूर शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने चिंता वाढू लागला आहे. वेळीच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून तसे प्रयत्नही सुरु आहेत. कोरोना रुग्णांचे स्वॅब घेण्यासाठी सध्या पंढरपूर शहरात दोन व वाखरी येथे एका ठिकाणी सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे आठशेहून अधिक लोकांचे स्वॅब घेवून कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शहर व तालुक्‍याची सुमारे साडेतीन लाख लोकसंख्येचा विचार करता ही संख्या अगदीच नगण्य आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी कोरोनामुक्त झालेल्या तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31 वर जावून पोचली आहे. दोन दिवसांपासून शहर व तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. संपर्कात आलेल्या लोकांमधूनच हा संसर्ग पसरू लागला आहे. अशा वेळी अधिकाधिक लोकांचे स्वॅब घेवून त्यांची चाचणी करण्याची गरज आहे. सध्या शहर व तालुक्‍यात संशयित रुग्णांची संख्या ही अधिक आहे. परंतु वेळेवर चाचणी होत नसल्याने संसर्ग वाढण्याचा अधिक धोका वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने अधिक लोकांचे स्वॅब घेवून त्यांची चाचणी करण्याची गरज या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. 

दोन अधिकाऱ्यांवर दिली जबाबदारी 
शहरातील वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या पंढरपूरकरांच्या चिंतेचा विषय झाला आहे. शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. संसर्ग झालेल्या परिसरातील सर्व लोकांचे स्वॅब घेवून त्यांची चाचणी करण्याची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. 

प्रशासनाचे प्रयत्न सुरू 
शहर व तालुक्‍यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोरोना रुग्णांचे स्वॅब घेवून चाचणी होणे आवश्‍यक आहे. अधिक संख्येने चाचण्या होणे गरजेचे आहे. त्यानंतरच साखळी तोडण्यास मदत होईल. अन्यथा संसर्ग वाढण्याची भिती आहे. 
- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT