Booster Dose esakal
सोलापूर

10 लोक जमल्यावरच फोडा व्हायल! एक लाख डोस पडून; १८ लाख व्यक्तींनी ‘बूस्टर’ घेतलाच नाही

कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. जिल्ह्यात सध्या एक लाख लसींचे डोस पडून आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. जिल्ह्यात सध्या एक लाख लसींचे डोस पडून आहेत. त्यामुळे आता लस वाया जाऊ नये म्हणून १० ते २० लोक जमल्याशिवाय लसीची व्हायल फोडू नका, अशा सूचना आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.‘कोवॅक्सिन’च्या व्हायलमध्ये २० डोस

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि धोकाही कमी झाल्यानंतर लोक निर्धास्त झाल्याची सद्य:स्थिती आहे. जिल्ह्यात कोरोनाचे ४५ रुग्ण शहरात दहा आणि ग्रामीणमध्ये ३५) असतानाही लोकांना भीती वाटत नाही. कोरोनामुळे आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील तब्बल दोन लाख १६ हजारांहून अधिक व्यक्ती बाधित झाल्या. सव्वापाच हजार व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाचा रुग्ण आढळलेल्या गावातील लोक घराबाहेर पडायला भीत होते. प्रतिबंधित लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण केंद्रांवर गर्दीच गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर प्रतिबंधित लसीकरणासाठी होणारी गर्दी आता पाहायला मिळत नाही. आता जिल्ह्यातील अक्कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर, सांगोला व दक्षिण सोलापूर हे तालुके तिसऱ्यांदा कोरोनामुक्त झाले आहेत. तर करमाळा, माढा, पंढरपूर व माळशिरस, बार्शी हे तालुके देखील कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. कोरोना झालेल्या रुग्णामध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळत नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो पाच-सहा दिवसांत बरा होत आहे. विशेष म्हणजे, त्याला स्वत:च्या घरीच उपचार घेण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोनाचा धोका संपल्याच्या आविर्भावात आता लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे

‘कोवॅक्सिन’च्या व्हायलमध्ये २० डोस

दुसरा डोस आणि बुस्टर डोस घेण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली असून १९ लाख व्यक्ती संरक्षित डोस घेणे अपेक्षित असतानाही केवळ एक लाख ६५ हजार जणांनीच तो डोस घेतला आहे. अद्याप पाच लाख व्यक्तींनी एकही डोस घेतलेला नाही. कोविशिल्ड, कोवॅक्सिन व कोर्बोवॅक्स अशा तिन्ही लसी सध्या उपलब्ध आहेत. कोवॅक्सिनच्या एका व्हायलमध्ये २० जणांना तर कोविशिल्ड व कोर्बोवॅक्स लसीच्या व्हायलमध्ये दहा जणांना लस टोचली जाते. त्यामुळे तेवढे लोक जमल्याशिवाय व्हायल फोडली जात नाही.

नागरिकांना लस टोचून घेण्याचे सातत्याने आवाहन करूनही लसीकरणाचा वेग मंदावला आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी एक हजार व्यक्तीच लस टोचतात. लस वाया जाणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. सध्या जवळपास एक लाख डोस शिल्लक आहेत.

- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा समन्वयक, लसीकरण, सोलापूर

लसीकरणाची सद्यस्थिती

टार्गेट

३७,८७,१६०

पहिला डोस घेतलेले

३२,५१,५८५

दोन्ही डोस घेतलेले

२४,४१,७२६

संरक्षित डोस घेतलेले

१,६५,५३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT