केत्तूर (सोलापूर) : पक्षी कुळात चिमणी हा पक्षी उष्णतेला अतिशय संवेदनशील आहे. जागतिक तापमान वाढीमुळे म्हणजेच ब्रह्मांड तापत असल्यामुळे सर्वांना प्रिय व सर्वपरिचित चिमणी हा पक्षी नष्ट होत चालल्याची खंत पक्षी निरीक्षक व पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी जागतिक पक्षी दिनानिमित्त व्यक्त केली.
डॉ. कुंभार पुढे म्हणाले, माणूस इतका गतिमान झाला आहे की, त्याला आपल्या भोवतालाकडे लक्ष द्यायला वेळच नाही व पर्यावरणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतो. आपल्या जीवनशैलीत बदल घडवून जुने व पारंपरिक रीतिरिवाज विसरत चालला आहे. चिमण्यांना पर्वणी असलेल्या ज्वारीचे पीक आज पाहायला मिळत नाही. चिमण्यांना मुबलक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणारे वड, पिंपळ, उंबर यांसारखी फळझाडे कमी झाली आहेत व त्या ठिकाणी सुबाभूळ, कुबाभूळ, वेडीबाभूळ अशी चिमण्यांना न आवडणारी झाडे प्रचंड प्रमाणात उगवली आहेत. परागीभवनात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या चिमण्यांना वाचवणे ही काळाची गरज आहे.
गेल्या दहा-बारा वर्षांपासून चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे मत जगभरातील पक्षी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. पूर्वीच्या काळी घरादारांत चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता. सुगीच्या दिवसांत धान्य निवडताना तर चिमण्यांचा थवा घरासमोरून हलत नव्हता. ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातही आता चिमण्यांचे थवे दिसत नाहीत.
जर आपण चिमण्यांकडे असेच दुर्लक्ष केले तर एक दिवस माणूस वाचवा म्हणायची वेळ येईल. निसर्गातील गुरू मानणाऱ्या चिमण्यांवर आपण अन्याय करत आहोत. "एक घास चिऊचा व एक घास काऊचा' हे विसरून स्वार्थी बनून "एक घास चायनीजचा अन् एक घास नूडल्सचा' म्हणत आपण चिमण्यांवर संक्रांत आणली आहोत.
चिमण्यांवरील संकटाची प्रमुख कारणे
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.