Pandharpur Ashadhi Ekadashi  esakal
सोलापूर

होलार समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा; प्रबोधनकार ठाकरे चौकात उडाला एकच गोंधळ, काय आहे कारण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्यामुळे प्रबोधनकार ठाकरे चौकात एकच गोंधळ उडाला.

वैभव गाढवे

मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी येताना होलार समाजाच्या मागण्या मान्य करूनच पंढरपूरला यावे, असा इशारा होलार समाजाने दिला होता.

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (ता. १६) रात्री पंढरपुरात आल्यानंतर होलार समाजाच्या (Holar Community) कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांची एकच धांदल उडाली.

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्यामुळे प्रबोधनकार ठाकरे चौकात एकच गोंधळ उडाला. होलार समाजासाठी अभ्यास आयोगाची स्थापना करावी, स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी होलार समाजाने आंदोलन पुकारले होते.

मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी येताना होलार समाजाच्या मागण्या मान्य करूनच पंढरपूरला यावे, असा इशारा होलार समाजाने दिला होता. त्यानंतर आज होलार समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवून घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करत सर्व मागण्या मान्य केल्या जातील, असे आश्वासन दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT