Bhagirath sakal
सोलापूर

पंढरपूरचे राजकारण अस्वस्थतेच्या हिंदोळ्यावर

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील परिचारक गट अन्‌ विठ्ठल परिवारात धूसफूस

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर: तालुक्‍यात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिचारक आणि विरोधी अशा दोन्ही गटातील मतभेद समोर येत आहेत. परिचारकविरोधी विठ्ठल परिवारातील भगीरथ भालके, युवराज पाटील आणि धाराशीव कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यातील मतभेद उफाळून आले असताना परिचारक गटातही धूसफूस सुरु झाली आहे. परिचारक समर्थक माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनी मंगळवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीत जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे नागेश भोसले सांगत असले तरी लवकरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

पंढरपूर तालुक्‍यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत आला आहे. कारखान्याचे संस्थापक आमदार (कै.) औदुंबरआण्णा पाटील यांच्या काळात विठ्ठल कारखाना प्रगतीपथावर होता. परंतु त्यानंतरच्या काळात राजकारणासाठी या कारखान्याचा हवातसा वापर झाल्याने कारखाना अडचणीत आला. कारखान्यावर सुमारे साडे पाचशे ते सहाशे कोटीहून अधिक कर्ज असल्याने कारखाना बंद आहे.

कारखाना डबघाईला आलेला असला तरी तो तालुक्‍याच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्याने कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना ताब्यात रहावा यासाठी विद्यमान अध्यक्ष भगीरथ भालके, विद्यमान संचालक आणि (कै.) औदुंबरआण्णांचे नातू युवराज पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याआधीच गेल्या दोन वर्षांपासून धाराशीव कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनीही विठ्ठल कारखाना ताब्यात घेण्यासाठी सभासदांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.

मध्यंतरी श्री विठ्ठल हॉस्पिटलवर आयोजित कार्यक्रमात युवराज पाटील आणि अभिजीत पाटील हे एकत्र आले होते. आपण चार कारखाने चालवून दाखवले आहेत. विठ्ठल कारखाना चालू करण्यासाठी देखील सर्वतोपरी मदत करु, असे अभिजीत पाटील यांनी जाहीर केले होते. त्यामुळे युवराज पाटील आणि अभिजीत पाटील हे एकत्र येण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. परंतु प्रत्यक्षात कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याचे उघड झाले आहे.

अभिजीत पाटील यांनी अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दोन, तीन वेळा भेटी घेतल्या. नुकतेच युवराज पाटील, (कै.) राजूबापू पाटील यांचे पुत्र ॲड. गणेश पाटील आणि ॲड. दीपक पवार यांनीही श्री. पवार यांची भेट घेऊन कारखान्याच्या संदर्भात चर्चा केली. ही चर्चा संपत असताना अभिजीत पाटील हे स्थानिक पातळीवर भाजपचे काम करतात, अशी तक्रार श्री. पवार यांच्याकडे करण्यात आली. परंतु शरद पवार यांनी या तक्रारीची फारशी दखल घेतली नाही. अभिजीत पाटील यांच्या विषयी शरद पवार यांच्याकडे तक्रार करत असतानाचा व्हीडीओ व्हायरल झाला. त्यावर अभिजीत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पंढरपर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराकडून लाखो रुपये घेऊन ज्या मंडळींनी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला. तेच आता आपल्याविषयी शरद पवार यांच्याकडे तक्रारी करत असल्याचे अभिजीत पाटील यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता कारखान्याच्या निवडणुकीवेळी युवराज पाटील, ॲड. गणेश पाटील, दीपक पवार यांचे एक, भगिरथ भालके आणि मंडळीचे दुसरे आणि अभिजीत पाटील यांचे तिसरे पॅनेल होण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे काय भूमिका घेतात याला महत्व येणार आहे.

परिचारक गटातही बंडाळी

गेली साडेसात वर्षे पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलेल्या साधना भोसले यांचे पती नागेश भोसले हे परिचारकांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. नगरपालिकेत आता पुन्हा प्रवेश करुन नगराध्यक्षपद मिळवण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली आहे. मनसेचे नेते दिलीप धोत्रे आणि विरोधी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत नागेश भोसले हे विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे परिचारक गटातून भोसले यांच्याविषयी नाराजी व्यक्त होत होती. आगामी नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारीवरुन नागेश भोसले यांचे परिचारकांशी मतभेद झाल्यानेच आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठीच श्री. भोसले यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. श्री. भोसले यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा गट सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि भोसले यांनी श्री. पवार यांची घेतलेली सदिच्छा भेट होती की राष्ट्रवादी पक्ष प्रवेशा संबंधाने घेतलेली प्रवेशपूर्व भेट होती हे आगामी काळात पहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

Latest Marathi Breaking News : बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिलं नाही- राज ठाकरेंची पोस्ट

Navale Bridge Accident : नवले पुलाजवळच्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे भावुक; महामार्ग सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

OpenAI Startup : फॅक्टरीत बनणार हवं तसं बाळ! आयुष्यभर कसलाच आजार नसेल; पाण्यासारखा पैसा ओततायत लोक; काय आहे Gene-Edited Baby

Kolhapur Leopard: झुडपातून बाहेर आला बिबट्या! समोरच्या थराराने पशुपालकाचे हृदयच थरारले; म्हैस-बकऱ्या टाकून गावाकडे धूम

SCROLL FOR NEXT