सोलापूर

वळसंगमध्ये सारीचा रुग्ण आढळला

सकाळ वृत्तसेवा

वळसंग(सोलापूर): वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे सारीचा रुग्ण आढळल्याने परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे. या प्रकाराने प्रत्येक जण सतर्क झाला आहे. येथील मटन विक्रेत्याच्या कुटुंबातील एक सदस्य सारी रुग्ण असल्याचे आढळल्याने खवय्यांचे धाबे दणाणले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्थानिक कोरोना प्रतिबंधक समितीने जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. बुधवार (ता. 10)पर्यंत हा जनता कर्फ्यू लागू राहणार आहे. दरम्यान, अक्कलकोट व सोलापूर परिसरातील सर्व मोठी दुकाने, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे वळसंगमध्ये 30 ते 35 किलोमीटर अंतरावरील लोकांची ये-जा खरेदीसाठी होती. 

रमजान व कारहुणवी या सणांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. त्याचा परिणाम होऊन परिसरात आणखी रुग्ण वाढतील की काय, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी वळसंगला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व खबरदारीच्या सूचना केल्या. सहायक पोलिस निरीक्षक श्री. माणगावे, तलाठी सचिन साळवे, ग्रामविकास अधिकारी दस्तगीर नदाफ, आरोग्य सहायक समीर शेख, सुनंदा बागलकोटी यांच्याकडून परिसर नाकेबंदीचे काम युद्धपातळीवर होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT