दंड
दंड Sakal
सोलापूर

फिटनेस सर्टिफिकेट नसलेल्या वाहनांना दंड

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - रस्त्यावर आणि महामार्गावर धावणारे वाहन तांत्रिकदृष्ट्या फिट असणे आवश्यक आहे. वाहनांमध्ये छोटासा बिघाड झाल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट महत्त्वाचे आहे. मात्र मागील वर्षभरात सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून फिटनेस सर्टिफिकेट नसलेल्या ७११ वाहनांवर कारवाई करून १३ लाख ५२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विशेषतः प्रवासी व मालवाहतूक वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट करून घेणे आवश्यक आहे. मालवाहतूक वाहने लांब पल्ल्याच्या मार्गावर वाहतूक करीत असतात. यात ट्रॅव्हल्स, एसटी बस, ट्रक या वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे अशा वाहनांची नियमित देखभाल- दुरुस्ती करणे आवश्यक आहे. योग्यता नसलेली वाहने रस्त्यावर धावत असल्याने अपघात होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांच्या फिटनेसची तपासणी केली जाते. वाहनांच्या ब्रेकपासून ते लाईट, टायर व तांत्रिक बाबींची अधिकाऱ्यांकडून पाहणी करून योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. एकंदरीत वाहन रस्त्यावर धावण्यासाठी व्यवस्थित असल्याचे योग्यता प्रमाणपत्र मिळते. फिटनेस नसल्यास प्रतिवाहन दंड आकारला जातो. त्यानंतर दिवसाला शंभर रुपये दंड आकारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

अशी झाली कारवाई

महिना वाहने दंड

जून २०२१ १४ ५२ हजार

जुलै ३९ १ लाख २८ हजार

ऑगस्ट - ०० ००

सप्टेंबर - ७ ००

ऑक्टोबर - ७ ८ हजार

नोव्हेंबर - ७ ००

डिसेंबर - ६१ १ लाख ४० हजार

जानेवारी २०२२ ११४ ३ लाख ३६ हजार

फेब्रुवारी - १२२ १ लाख ७६ हजार

मार्च - २४९ ३ लाख ८४ हजार

एकूण ७११ १३ लाख ५२ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT