cp rajendra mane
cp rajendra mane sakal
सोलापूर

सोलापूरकरांनो, जाणून घ्या नवरात्रोत्सवातील वाहतूक मार्गातील बदल! उद्या जड वाहतूक बंद

तात्या लांडगे

सोलापूर : शक्तीदेवीच्या उत्सवाला सोमवारपासून (ता. २६) प्रारंभ होत असून त्यादिवशी मुर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. नवरात्रोत्सवात काही मंडळांकडून मिरवणूक देखील काढली जाते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी वाहतुकीत बदल केला असून सोमवारी (ता. २६) सकाळी साडेसहा ते रात्री १२ वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी असणार आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त २६ सप्टेंबर रोजी व विसर्जनादिवशी ५ ऑक्टोबरला शहरातून शक्तीदेवीची मिरवणूक काढली जाते. काही मंडळांची मिरवणूक राष्ट्रीय महामार्गावरून निघते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने २६ सप्टेंबर व ५ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी शहरात येणारी किंवा शहरातून बाहेर जाणारी जड वाहतूक सकाळी साडेसहा ते रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दुसरीकडे ५ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणूक होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी सकाळी वाहतूक मार्गात बदल केला जाणार असल्याचेही पोलिस आयुक्तांनी आपल्या आदेशातून स्पष्ट केले आहे.

५ ऑक्टोबर रोजी वाहतूक मार्गातील बदल

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ५ ऑक्टोबर रोजी शहरातून मिरवणूक काढली जाते. त्यादिवशी सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक वाहने वगळता अन्य कोणत्याही वाहनांना मिरवणूक मार्गावरून प्रवेश नसेल. मिरवणूक रमाबाई आंबेडकर नगरातून डॉ. आंबेडकर उद्यान, सम्राट चौक, मिलिंद नगर, अस्थिमंदिर, पांजरापोळ चौक, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, चार पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जुना एम्प्लॉयमेंट चौक, डॉ. आंबेडकर हायस्कूल ते बुध्दविहार फॉरेस्ट अशी निघणार आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी त्यादिवशी समाचार चौक, जुना कारंबा नाका, छत्रपती संभाजी महाराज पुतळा, ॲम्बेसेटर हॉटेल, शरद पवार शाळा, जुना हिरज नाका, कल्पना कॉर्नर, भैय्या चौक, रेल्वे स्टेशन या मार्गाचा वापर करता येईल.

नवरात्रोत्सवात ‘हा’ मार्ग वाहतुकीसाठी बंद

नवरात्रोत्सवानिमित्त २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या काळात सकाळी सहा ते शेवटच्या दिवशीच्या रात्री १२ वाजेपर्यंत शहरातील काही मार्गावरील वाहतूक बंद असणार आहे. त्यानुसार बाळीवेस ते टिळक चौक आणि मधला मारूती ते कोंतम चौक या मार्गावरील वाहनांसाठी बाळीवेस ते बलिदान चौक आणि कुंभार वेस ते कोंतम चौक हा पर्यायी मार्ग असणार आहे. तसेच माणिक चौक ते मधला मारुती आणि मगळवार पेठ पोलिस चौकी हा मार्ग बंद असल्याने तेथून जाणाऱ्या वाहनांसाठी माणिक चौक ते समाचार चौक, तेथून कोंतम चौक ते कुंभार वेस-बलिदान चौक हा पर्यायी मार्ग असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Meta AI : व्हॉट्सअ‍ॅपवर कसं वापरायचं 'मेटा एआय'? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT