yoga.jpg 
सोलापूर

निराशा संपवून आनंददायी मॉर्निंग वॉक आणि योगा 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: लॉकडाउनमध्ये घरातच अडकलेले नागरिक, माध्यमांमध्ये कोरोनाबद्दलच्या बातम्यांचा मारा, सोलापुरात वाढत जाणारे रुग्ण या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमधील शिथिलता आनंददायी ठरली. पावसाळी थंड वातावरणात आता नागरिकांत भल्या पहाटे पूर्वीप्रमाणे आनंददायी मॉर्निंग वॉक व व्यायामामुळे नवा उत्साह पुन्हा एकदा दिसू लागला आहे. 

शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे संकट घोंगावत होते. सोलापूरकरांनी या संकटाशी सामना अनेक प्रकारे केला. तरी देखील मोठ्या संसर्गाला सामोरे जावे लागले. त्यानंतर संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते. पोलिसांची कारवाई सुरू होती. परंतु, त्या सोबत कोरोना संदर्भाने अनेक मुद्दे चर्चेला आले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा प्रतिकारक्षमतेचा होता. प्रतिबंधात्मक उपायांसोबत उत्तम आहार व त्या जोडीला व्यायामाचा मुद्दा अधोरेखित झाला. उत्तम संतुलित जीवनशैलीद्वारे निर्माण होणारी प्रतिकारक्षमता उपयुक्त ठरते हा संदेश अनेक माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोचला होता. 

लॉकडाउनमध्ये काहीशी सूट मिळाली. 1 जूननंतर शासनाने नियम शिथिल केले. त्यासोबत अचानक पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला. दिलासा देणाऱ्या या वातावरणाने व्यायाम व मॉर्निंग वॉक प्रेमींना अगदीच बाहेर पडण्याची प्रेरणा दिली. सकाळी सहा वाजल्यापासून वसाहतीतील अंतर्गत रस्ते व मुख्य रस्त्यावर चेहऱ्याला मास्क लावून फिरण्यासाठी नागरिक बाहेर पडले होते. मोकळ्या थंड हवेत हा वॉक करण्याचा उत्साह भरपूर होता. 


सोशल डिस्टन्सींगचा उपयोग 
वसाहतीच्या मोकळ्या जागांवर व्यायामाला देखील सुरवात झाली. वॉर्मअप, सूर्यनमस्कार व योगासने नागरिक करीत होते. सोशल डिस्टन्सिंगचा वापर काटेकोरपणे केला जात होता. आरोग्यदायी व्यायामाला कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची जोड होते. कोरोनाच्या निराशेतून बाहेर पडत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अनेक वृद्ध मंडळी देखील मास्क लावून परस्परांशी गप्पा मारत फिरत होते. काही जण रस्त्यांच्या बाजूला बेंचवर बसून बोलत होते. मॉर्निंग वॉकसाठी महिला देखील बाहेर पडल्या होत्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

Hair Care Tips: ताक फक्त पिण्यासाठी नाही! केसातला कोंडा कमी करण्यासाठी असाही करता येतो वापर

Marathi News Live Updates : कोयना परिसरात भूकंपाचा धक्का !

SCROLL FOR NEXT