police aayukt ankush shinde 
सोलापूर

पोलिस आयुक्‍तांचा दणका : सहा पोलिस कर्मचारी मुख्यालयात 

तात्या लांडगे

सोलापूर : येथील पाच पोलिस ठाण्यांमधील सहा पोलिस कर्मचाऱ्यांची बदली मुख्यालयात करुन पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना दणका दिला. 


एमआयडीसी पोलिस ठाणे, विजापूर नाका, जोडभावी पेठ, सदर बझार या पोलिस ठाण्यांमधील प्रत्येकी एक तर फौजदार चावडी पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्‍तांनी मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश काढले. दरम्यान, पोलिस ठाण्याच्या हद्दीत अथवा पोलिस ठाण्यातील कामकाजात सातत्याने हयगय केली. पोलिस तपास असो की कारवाईत हस्तक्षेप केल्याच्या तक्रारी आयुक्‍तांकडे आल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्‍त श्री. शिंदे यांनी ही कारवाई केल्याचीही चर्चा आयुक्‍तालयात सुरु होती. आयुक्‍तांनी या कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावल्याची चर्चा पोलिसांमध्ये सुरु होती. तत्पूर्वी, पुढील आदेश येईपर्यंत या सहा पोलिस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात पाठविण्यात येत आहे. संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्‍त करावे, असेही आयुक्‍तांनी आदेशात नमूद केले आहे. राखीव पोलिस निरीक्षकांनी संबंधित कर्मचारी हजर झाल्याचा अहवाल तत्काळ सादर करावा, असेही पोलिस आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे. 


मुख्यालयात बदली झालेले कर्मचारी 
पोलिस हवालदार गजानन किणगिरी (एमआयडीसी पोलिस ठाणे), उमेश पवार (विजापूर नाका), पोलिस नाईक दिलीप विधाते (फौजदार चावडी), राजू बनसोडे (जोडभावी पोलिस), तिमीर गायकवाड (फौजदार चावडी) आणि विकी गायकवाड (सदर बझार) यांची बदली मुख्यालयात करण्यात आली आहे. 

सराईत गुन्हेगार रोहित खताळ स्थानबध्द 
फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार रोहित सिद्राम खताळ (वय- 29, रा. जुनी मिल चाळ, मुरारजी पेठ) याला मंगळवारी (ता. 17) स्थानबध्द करण्यात आले. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी रोहित खताळने जुनी मिल चाळ, वारद चाळ, रामलाल चौक, पापय्या तालिम, मेकॅनिक चौक, भैय्या चौक, सरस्वती चौक, सुपर मार्केट या परिसरात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. परिसरातील नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून धमकावणे, मारहाण करुन बळजबरीने लुटमार, हाणामारी, दगडफेक, दंगा, चोरी, खंडणी, जबरी चोरी करणे, आगळीक करणे, गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग, गृह अतिक्रमण करणे अशा स्वरुपाचे गुन्हे त्याच्याविरुध्द दाखल आहेत. गुन्ह्यातील फिर्यादीसमवेत भिती व दशहत घालून तडजोड करुन प्रतिज्ञापत्र घेऊन प्रथम खबर उच्च न्यायालयातून रद्द करुन घेत होता. 2012 पासून त्याच्याविरुध्द फौजदार चावडी पोलिसांत आठ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला 2013, 2014 व 2019 मध्ये त्याला तडीपार करण्यात आले होते. तरीही त्याने अलिकडील काही दिवसांत खुनाचा प्रयत्न केला होता. त्याच्या वागणुकीत वारंवार सूचना करुनही सुधारणा न झाल्याने आता त्याची पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT