sand 
सोलापूर

पोलिसांना पाहताच वाळू चोर पळाले ! हाती लागला बैलगाडीसह किरकोळ मुद्देमाल

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : घर बांधकामासाठी अत्यावश्‍यक असणाऱ्या वाळूची उपलब्धता दुरापास्त झाली आहे. कारण, वाळू लिलाव बंद असल्याने वाळू मिळणे अवघड झाल्याने त्याला लाख मोलाची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे वाळू माफियांनी अवैधरीत्या नदी पात्रातून वाळू उपसा करून ती मोठ्या किमतीत विकणे सुरू केले आहे. वाळू वाहतुकीसाठी ट्रक, ट्रॅक्‍टरचा वापर होऊ लागला. मात्र पोलिसांच्या कारवाईत ही वाहने जप्त होऊ लागली. त्यामुळे वाळू माफियांनी आता बैलगाडीवरून वाळूची वाहतूक सुरू केल्याचे दिसून येत आहे. 

अशीच घटना राळेरास (ता. बार्शी) येथे घडली. पोलिसांना पाहताच बैलगाडी व वाळू सोडून वाळू चोरांनी धूम ठोकली. राळेरास येथील नागझरी नदी पात्रात ही घटना घडली. वाळू चोरांनी बैलगाडी व वाळूसह मुद्देमाल जागेवर सोडून पळाल्याने काही काळ पोलिसांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण, बैलगाडी पोलिस स्टेशनला कशी न्यायची, असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. याबाबत पोलिस अंमलदार रामेश्वर राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात वाळू चोरांविरोधात वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रामेश्वर शिंदे हे शेळगाव बीटच्या अंमलदाराचे मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. ते उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, पोलिस नाईक शिवाजी हाळे, भोसले, गृहरक्षक कदम असे मिळून राळेरास हद्दीत गस्त घालत होते. सकाळी 11 वाजता त्यांना राळेरासच्या नागझरी नदी पात्रात वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते नदी पात्राकडे गेले असता त्यांना दोन बैलगाड्या वाळू भरून चाललेल्या दिसून आल्या. ते बैलगाडीकडे गेले असता त्यांना पाहून गाडीचालक गाडी जागेवरच उभी करून पळून गेले. त्यामुळे त्यांनी बैलगाडी व त्यातील वाळू असा सुमारे 20 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त केला. 

त्या दोन अज्ञात इसमांच्या विरुद्ध भारतिय दंड विधान कलम 379, 34 पर्यावरण संरक्षण अधिनियम 15 व 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकलचा जम्बो ब्लॉक! 'या' लोकल रद्द, मेल, एक्स्प्रेस सेवांवरही परिणाम; कधी आणि कुठे? वेळापत्रक पहाच

मालदीवमध्ये स्पीडबोट समुद्रात उलटली; उद्योगपती गौतम सिंघानिया जखमी; ५ जण बेपत्ता

Panchang 21 March 2026: शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Sports News: पुणे, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे माहेरघर: मागील १२ वर्षांत आठ वेळा यजमानपद

सातारा झेडपीवर प्रथमच भाजपाचा झेंडा, मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंची खेळी

SCROLL FOR NEXT