Political reservation of obc reservation Ramesh baraskar solapur SAKAL
सोलापूर

ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू; रमेश बारसकर

रमेश बारसकर : मोहोळ येथे विचारविनिमय बैठक

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ : ओबीसी समाजाचे गेलेले राजकीय आरक्षण हे आता रस्त्यावर उतरून मिळवले पाहिजे व याचा एल्गार ज्योती क्रांती परिषदेच्या माध्यमातून मुंबईच्या आझाद मैदानावर करू, असा इशारा ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिला. मोहोळ येथे ‘ओबीसींचे गेलेले राजकीय आरक्षण‘ या विषयावर सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या विचारविनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बारसकर बोलत होते.

विचार विनिमय बैठकीमध्ये आपले मत व्यक्त करताना राज्यभरातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, येणाऱ्या काळामध्ये ओबीसींच्या न्याय हक्कासाठी रमेश बारसकर जी भूमिका घेतील त्याच्या पाठीशी महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज भक्कमपणे उभा राहिल. त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये ज्योती क्रांती परिषदेच्या माध्यमातून रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरामध्ये रथ यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन समाज प्रबोधन करून आरक्षणाचा नफातोटा सांगितला जाणार आहे. या रथयात्रेचा समारोप मुंबईतील आझाद मैदानावर विराट सभा घेऊन होणार आहे.

यावेळी व्हीजीएनटी प्रदेश प्रमुख मच्छिद्र भोसले, जिल्हा परिषद सदस्य अरूण तोडकर, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा फुले, निलंगा नगरपरिषद बांधकाम सभापती शरद पेठकर, नगरसेवक अतुल क्षीरसागर, प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षीरसागर, मारुती रोकडे, ओंकार आडत, उस्मानाबादचे लोमेश काळे, बाळासाहेब चिकलकर, महेश माळी, सागर यादव, स्वप्निल जानराव, सागर कोळी, प्रशांत जाधव, अरविंद राऊत, माणिक पिसे, उमेश सारवडकर, कोल्हापूरचे संतोष देसाई, संगिता पवार, ज्योती ननवरे, अनिता बळवंतकर, सागर अष्टुळ, बाळासाहेब माळी, सुलतान पटेल, सिद्धार्थ एकमल्ले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT