post.jpg
post.jpg 
सोलापूर

पोस्ट खात्याची बॅंकिंगमध्ये जोरदार कामगिरी ः विमा, बचत आणि अनेक सेवा 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः पोस्टाच्या पारंपारिक सेवांच्या सोबत ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बॅंकाच्या सर्व काउंटरसेवा, विमा योजना, एटीएम सेवा व पीपीएफ व शासकीय योजनाच्या अनेक सुविधामुळे आता टपाल खात्याचे स्वरुप आधुनिक बॅंकेसारखे झाले आहे. कोणत्याही राष्ट्रीयकृत बॅंकेच्या तुलनेत अधिक व्याज देणाऱ्या पोस्टाच्या योजना आता लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. अगदी पोस्टमनच्या माध्यमातून नागरिक स्वतःच्या बॅंक खात्यातील रक्कम देखील मागवू शकणार आहेत. 

पोस्ट खात्याचे रुपांतर आता इंडियन पोस्ट पेमेंटस बॅंकमध्ये रुपांतर झाले आहे. लॉकडाउनच्या काळात पोस्ट खात्याने पत्रे, औषधी व रोख रकमांची सेवा घरपोच पुरवली आहे. विमाक्षेत्रात टपाल विमा योजना, ग्रामीण विमा योजना आदी सुरू आहेत. कोणताही नागरिक या पोस्ट बॅंकेत स्वतःचे बचत खाते उघडू शकतो. तसेच पंतप्रधान सुकन्या योजना, अटल पेन्शन योजना सुरू आहेत. 

पोस्टामध्ये आता कोणत्याही नागरिकांना आधार कार्डाच्या आधारे इतर राष्ट्रीयीकृत बॅंकातील खात्यामधून रक्कम काढणे किंवा जमा करणे ही कामे करता येतात. त्यामुळे बॅंकामध्ये गर्दी व रांगेत उभे राहण्याची गरज नाही. अगदी पोस्टमन देखील घरपोच बॅंक खात्यातील काढता येणाऱ्या रकमेची सेवा देतो. शहरात महापालिकेने लॉकडाउन एक लाख पेक्षा अधिक लोकांची मालमत्ता कराची पत्रे सोलापूर पोस्टाच्या माध्यमातून स्पीड पोस्टाच्या सेवेद्वारी पाठवली. नागरिकांना त्यांचे स्वतःचे पीपीएफ खाते काढून रक्कम जमा करता येते. या रकमेवर 7.1 टक्के व्याज दिले जाते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राला सर्वाधिक म्हणजे दहा वर्षासाठी 8.80 टक्के व्याज दिले जात आहे. 
सोलापूर डाकघरने या वर्षी लॉजिस्टीक पार्सल सेवामध्ये उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळवला आहे. पंढरपूर पोस्टामध्ये पासपोर्ट काढून देण्याची सेवा उपलब्ध झाली आहे. 


- कोणत्याही राष्ट्रीयकृत बॅंक खात्याचे व्यवहार पोस्टातून आधारकार्डाद्वारे करण्याची सोय 
- पोस्टमनकडून बॅंक खात्यातील रक्कम घरपोच मिळण्याची सोय 
- पंतप्रधान सुकन्या व अटल पेन्शन योजनेला प्रतिसाद 
- न्यु पेन्शन स्किमद्वारे दिर्घकाळाची गुंतवणूक व पेन्शनचा लाभ 
- बचत खाते व एटीएम सेवा उपलब्ध 
- लवकरच राज्य व केंद्राच्या दोनशे सेवा देणारी केंद्रे सुरू होणार 

बॅंकींग व्यवहार करण्याच्या सुविधा
पोस्टाच्या विविध योजना व बॅंकींग व्यवहार करण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. नागरिकांना त्याचा लाभ घेता येत आहे. बॅंकिग, विमा व गुंतवणूक आदी प्रकारात योजना उपलब्ध केल्या आहेत. 
- एस.एस. पाठक, प्रवर अधिक्षक, सोलापूर डाकघर 

 
सोलापूर डाकघराची कामगिरी 
- पोस्टल विमा गुंतवणूक ः 28 कोटी 16 लाख रुपये 
- ग्रामीण विमा योजना : 18 कोटी 51 लाख रुपये 
- राष्ट्रीय बचतपत्र योजनेत सर्वाधिक व्याज 8.80 टक्के 
- ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक व्याजदर ः 7.4 टक्के 
- बचत खात्याचे खातेदार- 4 लाख 99 हजार 
- पाच तालुक्‍यात 205 शाखा 
- प्रत्येक गावापर्यंत पोस्ट व बॅंक सेवा  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT