घरकूल
घरकूल ESAKAL
सोलापूर

सोलापुरात घरकूल घोटाळा। बनावट पावत्या देऊन सहा लाखाला फसविले

तात्या लांडगे

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल मिळणार असून त्यासाठी आठ लाखांचे कर्ज मिळणार आहे. तसेच त्यावर दोन लाख ६७ हजारांची सबसिडी मिळणार आहे. पण, त्यासाठी दीड लाख रुपये भरावे लागतील म्हणून तिघांना सहा लाख १४ हजार ४०० रुपयाला गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. गौराप्पा तुकाराम गायकवाड (रा. सिध्दार्थ नगर, कुमठे) यांच्या फिर्यादीनुसार रोहित शिवाजी जाधव (रा. सुरवसे नगर, कुमठा नाका) व महापालिकेच्या संबंधित विभागाचा तत्कालीन स्टाफ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

ऑक्टोबर २०१६ मध्ये गौराप्पा गायकवाड यांना आवास योजनेतून घर मिळाणार असल्याची माहिती मिळाली. त्याची अधिक माहिती घेण्यासाठी ते महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयात गेले. त्यावेळी तेथील एकाने योजनेची सविस्तर माहिती दिली. घरकुलावर आठ लाखांचे कर्ज मिळते आणि परतफेडीचा व्याजदर ६.५ टक्के इतका असेल. या योजनेतून दोन लाख ६७ हजारांचे अनुदान मिळणार आहे. पण, तुमच्या हिश्याची काही रक्कम प्रोसिसिंग शुल्क, स्टॅम्पड्यूटी, मॉरगेज अर्ज करण्यासाठी दीड लाख रुपये भरावे लागतात, असेही त्यांना त्याठिकाणी सांगण्यात आले. त्याची महापालिकेकडून रितसर पावती मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर गौरप्पा गायकवाड यांनी वेळोवेळी एक लाख ३३ हजार रुपये भरले. तसेच त्यांचे नातेवाइक भारत ज्ञानदेव सुरवसे यांनी एक लाख ७० हजार रुपये, दत्तात्रय नागनाथ आठवले यांनी एक लाख ३१ हजार रुपये आणि शब्बीर दस्तीगिर तांबोळी यांनी एक लाख ८२ हजार ४०० रुपये भरले. संशयित आरोपींनी संगणमत करून शासकीय प्रोससिंग शुल्कचे कारण सांगून आमच्याकडून पैसे घेतले, असेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक क्षीरसागर हे तपास करीत आहेत.

सहा वर्षे वाट पाहिली पण घरकूल मिळालेच नाही
प्रधाानमंत्री आवास योजनेतून स्वत:च्या हक्काचा पक्का निवारा मिळेल, या आशेतून महापालिकेतील त्या लोकांवर विश्वास ठेवून पोटाला चिमटा घेऊन जतन करून ठेवलेली रक्कम दिली. २ डिसेंबर २०१६ रोजी पैसे दिले, पण अजूनही ना घर ना पैसे परत मिळाल्याची खंत गौराप्पा गायकवाड यांनी पोलिसांसमोर व्यक्त केली. आता त्या लोकांनी आणखी कितीजणांना अशाप्रकारे फसविले, याचा शोध सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT