1prakash_ambedkar1_5.jpg
1prakash_ambedkar1_5.jpg 
सोलापूर

'वंचित'चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर उद्या अक्‍कलकोट दौऱ्यावर 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याचे अख्खे मंत्रीमंडळ आता परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी व नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यभर दौरा करीत आहे. देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बहूतेक मंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधू लगाले आहेत. आता वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर उद्या (मंगळवारी) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. ते मंगळवारी सकाळी दहा वाजता अक्‍कलकोट तालुक्‍यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत, अशी माहिती वंचित आघाडीचे प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे यांनी दिली.

शेतकऱ्यांना मदत न झाल्यास रस्त्यावर उतरु 
परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचा संसार पाण्यात वाहून गेला आहे. असे असतानाही सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेतेमंडळी नुसता पाहणी दौरा करीत आहेत. सरकारने नुकसानग्रस्तांना तातडीची मदत दिलेली नाही. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने नुकसानग्रस्तांना तातडीने मदत न दिल्यास वंचित बहूजन आघाडी राज्यभर रस्त्यावर उतरेल, असा इशाराही वंचित बहूजन आघाडीतर्फे देण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT