Praniti Shinde sakal
सोलापूर

Praniti Shinde : प्रणिती शिंदेंच्या वक्तव्यातून काँग्रेसचा खरा चेहरा उघड ;भाजप पदाधिकाऱ्यांची टीका,पालकमंत्र्यांचा ‘चंपा’ म्हणून उल्लेख

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी तोंडाने इशारा करत ‘चंपा’ असा केला. दुसरीकडे दक्षिण सोलापुरातील एका कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांसमोर भाषण करताना ‘आता त्रास सहन करायचा नाही, तर त्रास देण्याची वेळ आली’, असे विधान केले.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी तोंडाने इशारा करत ‘चंपा’ असा केला. दुसरीकडे दक्षिण सोलापुरातील एका कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांसमोर भाषण करताना ‘आता त्रास सहन करायचा नाही, तर त्रास देण्याची वेळ आली’, असे विधान केले. अशा विधानांमुळे त्यांच्या डोक्यात खासदारकीची हवा शिरल्याने त्या अहंकारी, मग्रूर बनल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होणारी मागणी आणि निवडणूक निकालानंतरची त्यांची सततची वक्तव्ये यातून काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका भाजपने केली आहे.

नूतन खासदार शिंदेंनी मतदारसंघातील विविध तालुक्यांमध्ये, गावांमध्ये विजयी मेळावे, कार्यक्रम सुरू केले आहेत. प्रत्येक कार्यक्रमात त्या भाजपवर आसूड ओढायची एकही संधी सोडत नाहीत. त्यांचा बुधवारी (ता. १९) कंदलगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे गावभेट दौरा होता. त्याचवेळी पालकमंत्री पाटील यांनी आषाढी एकादशी आणि जिल्ह्यातील पर्यटनासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. त्याला जिल्ह्यातील खासदार, आमदारांना आमंत्रित केले होते. या बैठकीमुळे कार्यक्रमाला उशीर झाल्याने त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाउल्लेख ‘चंपा’ असा केला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. द

दरम्यान, गुरुवारी (ता. २०) कोगनुरे यांनी दक्षिण सोलापुरात आयोजिलेल्या एका शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमातही त्यांनी असेच विधान केले. भाजपमुळे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी आणि त्यांच्या सभासद शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. आता काँग्रेसची सत्ता आलीय, त्रास सहन करायची नाही, तर त्रास देण्याची वेळ आलीय. मागील १० वर्षांत तुम्हाला जो त्रास झालाय तो पुसून काढायचा असल्याचेही त्यांनी म्हटले.

जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनाही भरला दम

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फक्त भाजप महायुतीच्याच जिल्ह्यातील आमदारांना विकासकामांसाठी मागेल तेवढा निधी दिला जात असल्याचे सातत्याने बोलले जात होते. खासदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आमदारांच्या शिफारशीवरून काम देण्याचा जीआर आहे का? म्हणत यापुढे असे चालणार नाही, आता मी खासदार आहे असे सर्वांनाच स्पष्टपणे सांगितले. गाठ माझ्याशी आहे. ज्या गावांना निधी मिळाला नाही, तेथील विकासकामांना निधी द्यावा, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT