prashant paricharak sakal
सोलापूर

Mangalwedha News : उपमुख्यमंत्री फडणवीसच्या दौऱ्याला दांडी मारत परिचारकांचे गाव भेट दौरे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्यातील कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या प्रशांत परिचारकनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भेटीगाठी घेऊन निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्यातील कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या प्रशांत परिचारकनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भेटीगाठी घेऊन निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली.

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली चाणक्यनिती वापरत 80 हजार मताचा जनाधार असलेल्या प्रशांत परिचारक यांना मागे थांबवत उमेदवारी समाधान आवताडे यांना देत पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान इथल्या मतदारसंघाला तुम्ही भाजपचा उमेदवार निवडून द्या, मी महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो.

असे आश्वासन दिल्यानंतर आ. समाधान आवताडे विजयी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले कौशल्य वापरत महाविकास आघाडी सरकारचा देखील कार्यक्रम केला. त्यानंतर झालेल्या दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक समर्थकांनी भालके समर्थकाशी समझोता करत समविचारी आघाडीच्या माध्यमातून दामाजी कारखान्यावर सत्ता स्थापन केली.

तिथून पंढरपूर-मंगळवेढा भाजपात अवताडे परिचारक यांच्यात दरी वाढत गेली. मात्र प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी असतानाच बहुतांश समर्थकांनी त्यांना तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह केला. तर पंढरपुरातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपचीच उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्ष निरीक्षक आ. महेश लांडगे यांच्याकडे केली.

आ. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या अकराशे कोटीच्या विकासकामाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात अवताडे व परिचारक यांच्यातील वादावर समझोता होईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात असतानाच प्रशांत परिचारक यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली.

आज सकाळी त्यांनी तालुक्याच्या दक्षिण भागातील निवडक गावाचा दौरा केला. त्या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत चाचणी केली. यादरम्यान काही गावात त्यांना तीन वर्षातील केलेल्या अडचणीची गाह्राणी ऐकावी लागली. तर काही गावात या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवून महिलांचा सन्मान केला असला तरी महागाई देखील तितक्याच पटीने वाढवली.

त्यामुळे ही योजना उलट कुटुंबाला महागाईचा चटका देण्यासारखी झाली आहे. असे सांगून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करत त्यासाठी तुतारी चिन्हाचा विचार करावा, असे देखील सुतोवाच या गावाच्या दौऱ्यात केले. यावेळी त्यांच्या समवेत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, संचालक औदुंबर वाडदेकर, युन्नुश शेख, काशिनाथ पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT