pakshimitra sammelan logo.jpg 
सोलापूर

सोलापुरात 34 व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाची जोरात तयारी 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः येथे होणाऱ्या 34 व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हासाठी सापमार गरुड या शिकारी पक्ष्यांचा समावेश केला गेला आहे. 
महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या मार्गदर्शनाखाली या संमेलनाचे डॉ. मेतन फाउंडेशन, सामाजिक वनीकरण सोलापूर व महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ता. 10 व 11 एप्रिल रोजी आयोजन केले आहे. 
आज संमेलनाचे बोधचिन्ह निश्‍चित झाले. त्यामध्ये सापमार गरुड (शॉर्ट टोड स्नेक ईगल) या पक्ष्याचे चित्र असणार आहे. सोलापूर जिल्हा माळरान व गवताळ प्रदेश व त्यावरील जैविक विविधता यासाठी समृद्ध असून या माळरानावर अनेक शिकारी पक्षी आढळतात. या मधील सापमार गरुड पक्षी या माळरानावरील वैभव म्हणून ओळखला जातो. 
या संमेलनाची संकल्पना "माळरान- शिकार पक्षी - संवर्धन" असे ठेवण्यात आली आहे. 
बोधचिन्हाचे अनावरण उपवनसरंक्षक धैर्यशील पाटील यांच्या हस्ते अनावरण झाले. प्रा. निनाद शहा यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी विभागीय सामाजिक वनीकरण अधिकारी सुवर्ण माने, संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष निनाद शहा, डॉ. व्यंकटेश मेतन, रश्‍मी माने, अनिल जोशी, विनोद कामतेकर, प्रो. धनंजय शहा, सोमशेखर लवंगे, चिदानंद मुस्तारे उपस्थित होते. 
या संमेलनाच्या अगोदर शालेय विद्यार्थ्यांना, कॉलेज मधील विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांसाठी पक्षीमित्र संमेलन घेण्यात येणार आहे. या संमेलनात दरम्यान प्रख्यात पक्षीमित्र व अरण्यऋषी मारुती चितमपल्ली व बी. एस. कुलकर्णी यांच्या सन्मानार्थ उपक्रम होतील. या संमेलनामध्ये हिप्परगा तलाव, सिद्धेश्वर वनविहार व माळरानावर भ्रमंती आयोजित करण्यात आले आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळातील घेतल्या जाणाऱ्या नियमांचे पालन करून हे संमेलन होत आहे. 

ठळक बाबी 
- बोधचिन्हात सापमार गरुडांच्या चित्राचा समावेश 
- माळरान-शिकार पक्षी- संवर्धन संकल्पना 
- अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली व बी.एस. कुलकर्णी यांची सन्मानार्थ उपक्रम 
- हिप्परगा तलाव, सिध्देश्‍वर वनविहार व माळरान भ्रमंतीचे आयोजन 
-  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT