Narendra Modi and Sudarshan Yadav sakal
सोलापूर

Mangalwedha News : पंतप्रधानांना भेटण्याचा मंगळवेढ्यातील तरूणाला आला योग

घरात कोणताही राजकीय वारसा नसताना आणि स्वप्नात देखील वाटले नव्हते की, पंतप्रधानाशी भेटीचा योग येईल.

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - घरात कोणताही राजकीय वारसा नसताना आणि स्वप्नात देखील वाटले नव्हते की, पंतप्रधानाशी भेटीचा योग येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या भेटीमुळे आपल्या राजकीय जीवनाचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया मंगळवेढा येथील 28 वर्षे तरुण सुदर्शन यादव यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर मधील विडी कामगारांसाठी बांधण्यात देशातील सर्वात मोठ्या गृहसंकुलनाच्या रे नगर मधील लाभार्थ्याला घरकुलाच्या चावीचे वितरण कार्यक्रमासाठी ते सोलापूर आले असता विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी ज्या प्रमुख मान्यवरांना संधी देण्यात आली. त्यामध्ये सुदर्शन यादव यांचा समावेश होता.

पंतप्रधानाना उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विशेषता राजकीय पक्षाच्या काही निमंत्रितांनाच त्यामध्ये संधी दिली जाते. मात्र काल भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुका स्तरावरील लोकप्रतिनिधीच्या बरोबर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना देखील त्यामध्ये पंतप्रधानाशी भेटण्यासाठी संधी देण्यात आली होती. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांना संधी मिळाली.

त्यांचा घरामध्ये वडील शेती करत असून, आई गृहणी आहे. त्यामुळे घरामध्ये राजकारणाचा संबंध नाही. मात्र स्वतः शिकत असताना विद्यार्थी व अन्य प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी सातत्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सन 2012 ते 19 या कालावधीत केला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना उशिरा मिळणारी शिष्यवृत्ती व दुष्काळी परिस्थितीत तातडीने देण्यासाठी आंदोलनात पहिल्यांदा सहभाग नोंदवला.

2015 सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांमध्ये दुष्काळामध्ये सन 2015 साली माफ करावी यासाठी आंदोलन करून केले. त्याच विद्यापीठाचे उशिरा लागणारे निकाल, निकालातील तफावत व अन्य प्रश्नावर त्यांनी विद्यार्थ्यासमवेत आग्रही आंदोलन केले. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथेही आंदोलन केले.

मंगळवेढ्यातील रस्ते, गटारी, नगरपालिकेचा बगीचा, पार्किंग व अन्य नगरपालिकेच्या सोयी सुविधावर सातत्याने आवाज उठवून न्याय मिळवून देण्याची भूमिका पार पाडताना. ऐन रात्री 12 वाजता स्पर्धा परीक्षा रद्द केल्याच्या निषेधार्थ तत्कालीन शिक्षण मंत्र्याला जोडेमारो आंदोलन केल्यामुळे सुदर्शन यादव हे अधिक चर्चेत आले.

हे देखील त्यांच्या आक्रमक कार्याची दखल घेत त्यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदावर संधी दिली. मात्र पंतप्रधानाच्या सोलापूर दौऱ्यात थेट आमदार, खासदार अशा पदावर नसताना देखील भेटण्याची संधी आ. सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांच्यामुळे मिळाल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT