prime minister narendra modi visit solapur on 25th december politics sakal
सोलापूर

Solapur News : पंतप्रधानांचा २५ डिसेंबरला सोलापूर दौरा शक्य

‘रे नगर’ गृहनिर्माण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा; ‘एसटीपी’सह इतर कामे युद्धपातळीवर

सकाळ वृत्तसेवा

Solapur News: येथील कुंभारी परिसरातील रे नगरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलांचे काम सुरु आहे. पहिल्या टप्प्यात १५ हजार घरे बांधून पूर्ण झाली आहेत. सध्या अंगणवाड्या, रस्त्यासह सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे (एसटीपी) काम युद्धपातळीवर सुरु आहे.

१५ हजार घरांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २५ डिसेंबर रोजी सोलापूर दौरा शक्य आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रे नगर परिसरात देशातील सर्वात मोठा ३० हजार घरकुलांचा प्रकल्प ‘म्हाडा’च्या माध्यमातून उभारला जात आहे.

त्याची मुदत डिसेंबर २०२४पर्यंत आहे. तत्पूर्वी, १५ हजार घरांचे काम पूर्ण झाले आहे. त्या घरांची रंगरंगोटी पूर्ण झाली असून आता अंतर्गत रस्ता व एसटीपीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आता त्याठिकाणी ४० अंगणवाड्यांचे बांधकाम सुरू असून त्यातील तीन अंगणवाड्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

उर्वरित अंगणवाड्यांची कामे पूर्ण झाली आहेत. आता काही दिवसांत त्याठिकाणी येणाऱ्या चिमुकल्यांना शिकविण्यासाठी सेविकांची नेमणूक केली जाणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सहा शाळा सुरू केल्या जाणार आहेत.

त्यात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या तीन उर्दू व तीन मराठी माध्यमांच्या शाळा आहेत. त्यासाठी त्रुटींची पूर्तता करून केंद्र सरकारकडे फेरप्रस्ताव पाठविला आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर रे नगर प्रकल्पाच्या ठिकाणी जिल्हा परिषदेतर्फे सहा शाळा सुरू होतील.

दरम्यान, या घरकूल प्रकल्पाच्या कामाची स्थिती पाहण्यासाठी ‘पीएमओ’ कार्यालयाचे अधिकारी १५ ते २० डिसेंबर दरम्यान सोलापुरात येणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २५ डिसेंबरला की पुढे कधी, यासंबंधीचा दौरा निश्चित होणार आहे.

लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी कार्यक्रम

‘रे नगर’चा घरकूल प्रकल्पाअंतर्गत १५ हजार घरे बांधून तयार आहेत. पण, अंतर्गत रस्ते, सांडपाण्याच्या शुद्धीकरणाची व्यवस्था, दिवाबत्ती, शाळांची कामे अजूनही सुरुच आहेत. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त २५ डिसेंबरला लोकार्पण सोहळा घेण्याचे नियोजित आहे.

कामे पूर्ण न झाल्यास हा सोहळा पुढे काही दिवस लांबणीवर जाऊ शकतो. तरीपण, लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

‘एसटीपी’चे काम २० डिसेंबरपर्यंत

रे नगर प्रकल्पातील घरांमधील सांडपाणी एकत्रित साठवून त्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी ‘एनटीपीसी’ला दिले जाणार आहे. सध्या त्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम हाती घेण्यात आले आहे. २० डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती ‘म्हाडा’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह माजी आमदार नरसय्या आडम यांचाही त्यासंबंधी सतत पाठपुरावा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT