doctor.jpg
doctor.jpg 
सोलापूर

कोरोना युध्दासाठी खासगी रुग्णालयांना हवे पाठबळ 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः कोरोना संसर्गात रेडझोन मध्ये असलेल्या सोलापुरातील खासगी रुग्णालयांची सेवा सुरु करताना संभाव्य कोरोना संसर्ग,मृत्यु व तक्रारीच्या संदर्भात प्रशासनाचे व्यापक पाठबळ व संभाव्य संकटासाठी परिपुर्ण मदत मागितली आहे. 
कॅन्टॉनमेंट झोनमध्ये रुग्णालय उघडण्याचे धोरण प्रशासनाने ठरवावे. स्पेशालीटी सोडून इतर आजारांच्या रुग्णांना कोठे पाठवावे हे ठरवले पाहिजे. सर्व रुग्णालयाच्या समस्या संदर्भात चोवीस तास सुचना देणारा एक कायमस्वरुपी प्रशासन अधीकारी संपर्क अधिकारी नेमावा. 
जर एखाद्या रुग्णाला ताप, सर्दी खोकल्याची ( क्‍लासिक इन्फ्लूएंझा) लक्षणे असल्यास त्यावर उपचार करायचे की सिव्हील हॉस्पिटलला पाठवायचे हे आधी ठरवले जावे. पाहिजे. एखाद्या आपत्कालीन रुग्णाला रात्रीच्या वेळी किंवा दिवसाच्या वेळी त्याच्या इतर वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियेच्या समस्येसाठी दाखल केले आणि त्याच रुग्णाला कोविडच्या आजाराचा संशय व्यक्त केला तर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये कोरोना चाचणी सेवा हवी आहे. 

ऍम्ब्युलेटरी रूग्णाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवणे शक्‍य आहे परंतु रुग्ण नॉन ऍम्ब्युलेटरी असल्यास रुग्णालयात किंवा आमच्या नर्सिंग होममध्ये टेस्टसाठी स्वॅब घेण्याचे नियोजन व्हावे. ही चाचणी खाजगी प्रयोगशाळेत करता यावी. रुग्णांना टेस्ट रिपोर्टसाटी तीन चार दिवस वाट पाहावी लागणार आहे. तो पर्यंत रूग्ण आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका असणार आहे. रुग्णाचा कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली तर प्रोटोकॉल ठरवणे आवश्‍यक आहे. कोविड पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशी पायाभूत सुविधा नसल्यास हे रुग्ण कोठे पाठवावेत हा प्रश्‍न आहे. हे रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्यास तयार नसेल तर त्यांना खासगी हॉस्पिटलची सेवा मिळावी. 

रुग्ण पॉझिटिव्ह निघाला तर 
उपरोक्त रुग्ण कोविडसाठी पॉझिटीव्ह झाल्यास त्यांच्या संपर्कातील कर्मचारी आणि डॉक्‍टर यांच्या विलगीकरणाची प्रक्रिया ठरवली पाहिजे. रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्‍टर कोरोना संक्रमित झाल्यास किंवा त्यांच्यामध्ये लक्षणे दिसल्यास तत्काळ कोरोना टेस्ट व उपचार केले जावेत. 
लक्षण विरहीत कोवीड पॉझिटिव्ह डॉक्‍टर व कर्मचारी असल्यास त्यांना त्यांच्या घरीच विलगीकरणामध्ये ठेवण्याची परवानगी दिली जावी.रुग्ण रुग्णालयात पॉझिटिव्ह आला तर रुग्णालय बंद ठेवण्याचा व नंतर सुरू करण्याची प्रक्रिया ठरवली पाहिजे. 

स्वॅब गोळा करण्याचे काम व्हावे 
ऑपरेटिव्ह (शस्त्रक्रियेच्या) रूग्णाच्या बाबतीत मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णाची कोविड टेस्टिंग करावी लागणार आहे. तेंव्हा ती तपासणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण न पाठवता फक्त स्वॅब गोळा करून, तो स्वॅब तेथे पाठवून करण्याची सोय करावी किंवा खासगी लॅबमध्ये करण्याचा नियम ठरवावा. नियोजित शस्त्रक्रीयेच्या रुग्णाला कोरोना चाचणीचा रिपोर्ट येई पर्यंत त्याच्या घरीच क्वारंन्टाईन होण्याची परवानगी असावी. 

संसर्ग व मृत्युबद्दल दोष व कारवाई नको 
जर एखाद्या रुग्णात कोव्हिडं ची लक्षणे नसताना कोविड टेस्टिंग तपासणीचा रिपोर्ट येण्याआधी शस्त्रक्रिया करण्याची गरज भासल्यास आणि दुर्दैवाने जर हा रुग्ण नंतर पॉझिटिव्ह आल्यास या बाबतीत इस्पितळ प्रशासनास दुर्लक्षाचा ठपका ठेवून रुग्णालयात दोषी ठरवले जाऊ नये. या उपचाराच्या वेळी रूग्णांच्या नातेवाईकांनी, इस्पितळ प्रशासनाने योग्य ती खबरदारी न घेतल्याबद्दल रुग्णालयास दोष देण्यास सुरवात केली तर शस्त्रक्रीयेचे गांभीर्य समजुन घेणे आवश्‍यक आहे. अशा परिस्थितीत ज्या रुग्णास इतर कोणत्याही वैद्यकीय किंवा शल्यक्रियेच्या समस्येसाठी दाखल केले गेले आहे आणि रूग्णालयात नंतर कोविडं आजाराची लक्षणे आढळू लागल्यास त्यांच्या नातेवाईकांनी आमच्या रुग्णास, रुग्णालयात कोविडची लागण झाल्याचा दोष देणे सुरु केले तर रुग्णालयाबाबत प्रशासनाला सकारात्मक भुमीका घेऊन निर्णय घ्यावा लागेल. 

कोरोना योदध्यांची दखल घ्यावी 
कोविड युध्दात आरोग्य कर्मचारी आणि त्याचे घरातील कुटूंबियांना कोविडची लागण झाली व गंभीर आजारी पडले (ज्याला आयसीयू आणि व्हेंटिलेटरची आवश्‍यकता आहे) तर त्यांच्यासाठी युध्द जखमी सैनिकांप्रमाणे सर्वोत्तम उपचार मिळावेत. कोरोना योध्दा व त्यांचे कुटुंबीय यांना प्रमाणित केले जावे. त्यांना शासनाची पन्नास लाख रुपयांची विमा पॉलिसी लागू करावी. 

रुग्णांचा मृत्यू झाल्यास काय करावे 
खासगी रुग्णालयात कोविड रूग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याचा प्रोटोकॉल ठरवला पाहिजे. स्थानिक सिव्हिल हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्‍टरांच्या टीम ने किंवा खाजगी रुग्णालयाच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा आयएमए पदाधिकाऱ्यांनी खात्री करण्यापूर्वी कोणत्याही खासगी रुग्णालय किंवा डॉक्‍टरांविरोधात एफआयआर किंवा कोणतीही तक्रार दाखल केली जाऊ नये. कोविड संबंधित खटल्यांविरूद्ध खासगी रुग्णालयांना पुर्णतः संरक्षण हवे आहे.

सकारात्मक भुमीका असावी

शासनाने खासगी रुग्णालयांना कोरोना युध्दात साथ देताना हे डाॅक्टर व कर्मचारी कोरोनाविरुध्द लढत आहेत हे लक्षात घेऊन भुमीका समन्वयाची घ्यावी. रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे हा हेतू ठेवून हे काम चालावे.

डाॅ. राजेंद्र भगत, माजी अध्यक्ष निमा संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT