Private schools increased fees Esakal
सोलापूर

खासगी शाळांच्या फी वाढीवर लवकरच नियंत्रण! नऊ सदस्यीय समितीची नियुक्‍ती

लवकरच त्यावर तोडगा निघणार

सकाऴ वृत्तसेवा

सोलापूर : शाळा बंद असतानाही खासगी शाळांनी फी वाढ केली. शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याचा इशाराही काही शाळांनी पालकांना दिला. यासंदर्भातील दोन हजार 850 ऑनलाइन तक्रारी शालेय शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील सर्वाधिक 734 तक्रारी आहेत. 80 टक्‍के (2240) तक्रारी पालकांच्याच आहेत. राज्य सरकारने तक्रारींचा अभ्यास करून उपाय सुचविण्यासंदर्भात नऊ सदस्यीय समिती नियुक्‍त केली. त्यामुळे लवकरच त्यावर तोडगा निघणार आहे.

खासगी शाळांनी मनमानी पध्दतीने शैक्षणिक शुल्क वाढविल्यासंदर्भात पुण्यातून सर्वाधिक 734, ठाण्यातून 362, मुंबईतून 410, अकोल्यातून 105, नागपूरमधून 210, नाशिकमधून 136, रायगडमधून 104, साताऱ्यातून 178, सोलापूर शहरातून 35, अमरावतीतून 64, औरंगाबादमधून 72 तक्रारी दाखल झाल्या आहेत. गडचिरोली वगळता सर्वच जिल्ह्यातील पालकांनी फी वाढीसंदर्भात तक्रारी नोंदविल्या आहेत. कोरोना काळात शाळा बंद असतानाही फी वाढ केल्यावरून पालक, पालक संघटना प्रतिनिधी, शैक्षणिक संस्था सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. या तक्रारींचा आधार घेऊन विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनयमन) अधिनियम-2011 आणि 2016 तसेच 2018 मध्ये बदल केला जाणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी यांच्या अध्यक्षतेखाली 5 मार्च रोजी नऊ सदस्यीय समिती नियुक्‍त करण्यात आली आहे. मात्र, कोरोनामुळे सर्वांना एकत्रित बोलावून बैठक घेणे अशक्‍य असल्याने या समितीने अजूनही बैठक घेतलेली नाही.

तीन महिन्यात जाईल अहवाल

राज्यातील खासगी शाळांच्या फी वाढीसंदर्भात सातत्याने तक्रारी वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पूर्वीच्या व्ही. जी. पळशीकर समितीच्या शिफारशीबरोबरच अन्य राज्यातील फी अधिनियम व नियमांचाही अभ्यास करावा लागणार आहे. पालकांच्या तक्रारीचे स्वरूप जाणून घेऊन राज्यातील सर्वच खासगी शाळांच्या फी वाढीवर कसे निर्बंध घालता येतील, त्यासंदर्भात कायद्यात काय बदल करता येईल का, याचा अभ्यास समितीच्या माध्यमातून केला जात आहे. तीन महिन्यात समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करणे अपेक्षित आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या समितीची पहिली बैठक काही दिवसांत घेऊन सरकारला तात्पुरते उपाय सूचविले जातील, असे समितीचे अध्यक्ष श्री. काझी यांनी सांगितले.

बातमीदार : तात्या लांडगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT