Production of 1.36 lakh plants in month solapur 
सोलापूर

एकाच महिन्यात १.३६ लाख रोपांची निर्मिती

त्रिभूवन जक्कल यांचा विक्रम; वृक्षारोपणासाठी १० हजार रोपे देणार; देशी प्रजातींना प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - एकाच महिन्यात जंगली झाडांची विक्रमी म्हणजे एक लाख ३६ हजार रोपे तयार करण्याच विक्रम येथील रोपवाटिका व्यवसायिक त्रिभूवन जक्कल यांनी केला आहे. त्यापैकी १० हजार झाडे ही थेट जंगलात मोफत लावली जाणार आहेत. त्रिभूवन जक्कल हे मागील चार दशकापासून रोपवाटिका क्षेत्रात काम करतात. यावर्षी त्यांनी कोंडीत त्यांची रोपवाटिका उभारली होती. या रोपवाटिकेत त्यांनी जंगली झाडांची रोपे तयार करण्याचे काम सुरु केले.

आतापर्यंत रोपे तयार करण्याचे काम ते वर्षातील अनेक महिने सातत्याने करत असतात. पण यावर्षी एकाच महिन्यात सर्वाधिक रोपे तयार करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कोंडी येथील जैन मंदिराच्या परिसरात उद्योजक नंदकिशोर मोतीचंद शहा यांच्या मदतीने रोपवाटिकेत काम सुरु केले. जंगली झाडांची संख्या वाढावी. ही झाडे अधिक संख्येने सर्व मोकळ्या जागी लावली जावीत यासाठी त्यांनी हे काम सुरु केले. त्यासाठी त्यांनी करंज, पिंपरणी, वड, पिंपळ, कडूलिंब, सिताफळ, कडूलिंब, आंबा या सारख्या देशी प्रजातींची निवड केली गेली. त्यानंतर त्यांनी कोंडीतील रोपवाटिकेत रोपे तयार करण्याचे काम सुरु केले.

झाडाची निवड, बिया रुजवणे, रोपे तयार करणे अशी सर्व कामे एकाच महिन्यात करण्यात आली. बघता बघता रोपवाटिकेचा परिसर हिरव्यागार रोपांनी व्यापला गेला. याच ठिकाणी श्री. शहा यांच्या पुढाकाराने मंदिर भागात देखील देखणा बगिचा उभारला जात आहे. तयार केलेल्या रोपांच्या पैकी दहा हजार रोपे ही सामाजिक संस्थांना वृक्षसंवर्धनासाठी दिले जाणार आहेत.

ठळक बाबी

  • कोंडीत रोप निर्मितीचे काम

  • झाडाची निवड, बियांचे रोपण, रोपांची वाढ अशी सर्व कामे एकाच ठिकाणी

  • एकाच महिन्यात १ लाख ३६ हजार रोपांची निर्मिती

  • त्यापैकी १० हजार रोपे सामाजिंक संस्थांना वृक्षलागवडीसाठी देणार

यापूर्वीपासून रोपवाटिकेचे कामे करत होतो. पण यावर्षी एकाच महिन्यात विक्रमी संख्येने १ लाख ३६ हजार रोपे तयार करण्याचा पहिल्यांदाच विक्रम झाला. त्यातील काही रोपे सामाजिक संस्थांना देणार आहे.

- त्रिभूवन जक्कल, संचालक, लिली नर्सरी रोपवाटिका, सोलापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: सून सासरच्यांचा सांभाळ करण्यास बांधील नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, वारसा हक्क आणि पोटगी वेगवेगळे

Pune Rain Update : पुण्यात अवकाळीची एन्ट्री; बाणेरमध्ये गारांचा पाऊस, उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा

Latest Marathi News Live Update : भारत सरकारकडे पुरेसा गॅस, इंधनसाठा उपलब्ध : छगन भुजबळ

Political Statement : नशेखोरांविरोधात रस्त्यावर उतरणार; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा इशारा

Ajinkya Rahane: KKR चे 25 कोटी पाण्यात ग्रीनच्या 'नो बॉलिंग'ने कोलकात्याचं गणित बिघडलं; रहाणेंचं उत्तर ऐकून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT