dattatray bharne sakal
सोलापूर

बोरामणी विमानतळ निर्वनीकरणाचा पुन्हा अर्ज ! दत्तात्रय भरणे

कोरोना विषय उपाययोजनांचा आढावा, जिल्हा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते.

प्रमोद बोडके

सोलापूर - बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आंतराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित केलेल्या जमिनीत काही जमिन वनविभागाची आहे. प्रशासनाने केंद्रीय समितीकडे सादर केलेला वन जमिन निर्वनीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय समितीने फेटाळला आहे. शासनाच्यावतीने या समितीकडे निर्वनीकरणाचा प्रस्ताव नव्याने सादर केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली.

कोरोना विषय उपाययोजनांचा आढावा, जिल्हा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सात रस्ता येथील नियोजन भवनात झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बोरामणी येथील विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लागावा, विमानतळाच्या निर्वनीकरणाचा प्रश्‍न सोडविण्यसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्ली स्तरावर संबंधित मंत्री, खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलून प्रयत्न करत असल्याचेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

विमानतळाशेजारी असलेली जागा वन विभागाला पर्यायी जागा देण्यास शासन तयार आहे. त्यामुळे हा विषय मार्गी लागेल असा विश्‍वासही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. होटगी रोडवरील विमानतळारुन विमानसेवा सुरु करण्यासाठी सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीसह इतर अडथळे येत आहेत. चिमणीचा विषय अभिप्रायासाठी राज्य सरकारकडे गेला आहे. या विषयाची आपल्याला अधिक माहिती नसून या विषयाची माहिती घेतो असेही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT