Rain sakal
सोलापूर

पुणे शहर, जिल्ह्यात २४ तासात ३० मिमी पाऊस

खडकवासला प्रकल्पात ८.७० टीएमसी पाणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातील दिवसातील सर्वाधिक पाऊस सोमवारी (ता.११) नोंदला गेला आहे. गेल्या २४ तासात पुणे शहरात १६.८ मिमी तर, जिल्ह्यात ३० मीमी पाऊस पडला आहे. दरम्यान, या पावसामुळे पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

या प्रकल्पात आता ८.७० पीएमसी पाणी साठां झाला आहे. एकूण पाणीसाठ्याचे हे प्रमाण २९.८५ टक्के इतके झाले आहे. गेल्या वर्षीच्या याच तारखेच्या तुलनेत ०.०७ टीएमसीने जास्त पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला या धरणांत एकूण ८.६३ टीएमसी (२९.६२ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता, असे जलसंपदा विभागाच्यावतीने सोमवारी (ता.११) सकाळी सहा वाजता प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरणसाठा आकडेवारी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक ८८.८ मिमी पाऊस वेल्हे तालुक्यात तर, सर्वांत कमी म्हणजे केवळ ०.९ मिमी पाऊस इंदापूर तालुक्यात नोंदला गेला आहे.खडकवासला प्रकल्पांतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु आहे.खडकवासला प्रकल्पात खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही चार धरणे येतात. गेल्या २४ खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १९ मिलिमिटर, पानशेत पाणलोट क्षेत्रात १०५ मिलिमिटर, वरसगाव पाणलोट क्षेत्रात ९७ आणि टेमघर पाणलोट क्षेत्रात ११० मिलिमिटर इतका पाऊस झाला आहे.

धरणनिहाय ११ जुलैचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

- खडकवासला --- १.२८

- पानशेत --- ३.२५

- वरसगाव --- ३.५५

- टेमघर --- ०.६२

- चारही धरणांतील एकूण साठा --- ८.७०

- गेल्या वर्षीचा या तारखेचा साठा --- ८.६३

पुणे शहरातील पाऊस मिमीमध्ये

- कर्वेनगर ---- १३ मिमी

- शहर (मध्यवर्ती) ---२०.५

- कोथरूड ---- ३५.५

- खडकवासला ---- २३

- हडपसर ---- ७.८

- वाघोली ----- १०.८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

मला वाईट वाटतं, मी का बोलले नाही.. प्रथा म्हणून डोहाळे जेवणात घडलेली ती गोष्ट; मृणाल कुलकर्णी आजही विसरलेल्या नाही

Tablet For Students: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅबलेट! मुख्यमंत्र्यांचा निर्णय, DBTद्वारे थेट खात्यात रक्कम

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

SCROLL FOR NEXT