pune sangli solapur vehicle theft accused arrested 5 bike seize crime branch Sakal
सोलापूर

Solapur Crime News : पुणे, सांगली, सोलापुरातील दुचाकी चोरणारा जेरबंद; चोरट्याकडून पाच दुचाकी हस्तगत

शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला चोरीच्या दुचाकी विकायला आल्यावर सापळा रचून पकडले.

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : येथील कौतम चौकात दुचाकी मॅकेनिक म्हणून काम करणाऱ्या बालाजी नागनाथसा मलजी याने दारूच्या व्यसनासाठी सोलापूर शहरातून तीन तर पुणे, सांगलीतून प्रत्येकी एक अशा पाच दुचाकी चोरल्या. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला चोरीच्या दुचाकी विकायला आल्यावर सापळा रचून पकडले.

दुचाकी दुरुस्ती करण्याचा व्यवसाय असतानाही संशयित आरोपी बालाजी मलजी याला दुचाकी चोरीची सवय लागली. त्याने सोलापूर शहरातील फौजदार चावडी, विजापूर नाका व जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दुचाकी चोरली होती.

त्यानंतर त्याने सांगली जिल्ह्यातील उमदी पोलिस ठाणे व पुण्यातील हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून देखील प्रत्येकी एक दुचाकी चोरली होती. नवीनच चोरटा असल्याने पोलिसांनाही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.

पण, अखेर खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली आणि बालाजी मलजी अलगद पोलिसांच्या सापळ्यात अडकला. अक्कलकोट रोडवरील लक्ष्मी नगराजवळील मोकळ्या मैदानात चोरीची दुचाकी विकायला बालाजी आला होता. खबऱ्याने ही माहिती पोलिसांना दिली होती.

त्यानुसार शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील,

विद्यासागर मोहिते, गणेश शिंदे, अविनाश पाटील, मच्छिंद्र राठोड, प्रकाश गायकवाड यांच्या पथकाने त्याठिकाणी सापळा लावला. काहीवेळाने पोलिसांनी त्याला भारतरत्न इंदिरानगर, राठी कारखान्यासमोर पकडले. त्याच्याकडे चौकशी केली, त्यावेळी पाच दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT