The Pune-Solapur-Kalburgi Express should be started 
सोलापूर

पुणे- सोलापूर- कलबुर्गी एक्‍स्प्रेस सुरू करावी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पुणे-मुंबई (इंद्रायणी एक्‍स्प्रेस) व पुणे-सोलापूरला (इंटरसिटी एक्‍स्प्रेस) 1 फेब्रुवारीपासून कायमस्वरूपी एलएचबी रेक जोडण्यात आला आहे. त्यामुळे या गाड्यांच्या जुन्या रेकचा वापर करून पुणे- सोलापूर- कलबुर्गी एक्‍स्प्रेस ही नवी गाडी सुरू करावी, अशी मागणी प्रवासी सेवा संघाने केली आहे. 


पुण्याहून सोलापूर व कलबुर्गीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्‍वभूमीवर इंद्रायणी एक्‍स्प्रेस व इंटरसिटी एक्‍स्प्रेसचे पूर्वीचे जुने डबे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या रेल्वे गाडीला जोडल्यास नवी गाडी सुरू होईल. सध्या पूर्वीचा जुना रेक मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडे शिल्लक आहे. गाडी पुणे येथून सकाळी 6.45 वाजता सोडावी, कलबुर्गी येथे दुपारी 1.45 वाजता पोचावी. कलबुर्गी येथून परतीच्या प्रवासाकरिता दुपारी 2.45 वाजता सोडावी व पुणे येथे रात्री 9.15 वाजता पोचावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या गाडीची दुरुस्ती व देखभाल पुणे विभागाने करावी, असेही त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हडपसर, दौंड, कुर्डुवाडी, माढा, सोलापूर, अक्‍कलकोट रोड, दुधनी, गाणगापूर रोड येथे थांबे देण्यात यावेत. जेणेकरून प्रवाशांची सोय होईल आणि या एक्‍स्प्रेसला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास प्रवासी सेवा संघाने व्यक्‍त केला आहे. या वेळी सेवा संघाचे सचिव संजय चौगुले, नंदू दळवी आदी उपस्थित होते. 

नवी गाडी सुरू करता येऊ शकते
केंद्रीय अर्थसंकल्पात सोलापूरसाठी कोणत्या नव्या गाड्या सुरू करण्यात आल्या, दुहेरीकरणासाठी किती निधी मंजूर केला आहे, सोलापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी निधी दिला आहे का, याचा उलगडा झालेला नाही. दरम्यान, सोलापुरातून जाणाऱ्या इंद्रायणी एक्‍स्प्रेस व इंटरसिटी एक्‍स्प्रेसचे जुने रेक वापरून प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे- सोलापूर- कलबुर्गी ही नवी रेल्वेगाडी सुरू करता येऊ शकते. या मागणीवर प्रवासी सेवा संघ ठाम असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्‍न मार्गी लावू. 
- संजय पाटील, जिल्हाध्यक्ष, प्रवासी सेवा संघ, सोलापूर  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ना तारण, ना जामीनदार द्यावा लागणार, तरी बॅंकेतून मिळणार २५ लाखांपर्यंत कर्ज, कोणती आहे योजना? वाचा...

सोलापुरात कांद्याच्या भावात २५० रुपयांची घसरण! तीन दिवसांत १२४५ गाड्या आवक; आता प्रतिक्विंटल १२५० ते ३३०० रुपयांपर्यंत दर

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या किडनी विक्रीतील एजंट सोलापूरचा; मोबाईल लोकेशनवरुन कृष्णा सोलापुरात पकडला; अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या कृष्णाने नावापुढे लावली डॉक्टरची पदवी

Morning Breakfast Recipe: नेहमीचेच पोहे बनवण्यापेक्षा, एकदा असेही बनवून पाहा, सर्वजण करतील कौतुक, लेगच लिहून घ्या रेसिपी

त्वचेचे आजार व आतड्यांचे आरोग्य

SCROLL FOR NEXT