raju shetti criticize state govt over not announcing drought karnataka politics marathi news esakal
सोलापूर

Solapur : परिस्थिती गंभीर असली तरी सरकारला दुष्काळ जाहीर करण्यास वेळ मिळेना - राजू शेट्टी

राजू शेट्टी; पत्रकार परिषदेतून राज्यकर्त्यांवर टीकास्त्र

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कर्नाटकने दुष्काळ आधीच जाहीर केला. पण राज्य सरकारला अजून दुष्काळ जाहीर करण्यास वेळ मिळाला नाही असे टीकास्त्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोडले. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, साखरेचे भाव वाढले आहेत. पुढील वर्षीदेखील साखरेचा तुटवडा राहणार असल्याने हे अर्थकारण भक्कम आहे. केंद्राने निश्चित केलेल्या भावाच्या तुलनेत ५०० रुपये जादा दर कारखान्यांना मिळाला. इथेनॉल निर्मितीदेखील करुन नफा मिळविला. पण एफआरपीच्या वर कोणतीच रक्कम ऊस उत्पादकांना दिली नाही. या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. कारखान्यांना गळीत हंगाम सुरु करुन देणार नाही.

यावर्षी दुष्काळाची स्थिती महाराष्ट्रात आहे.यावर्षी कोणतीच पिके फारशी चांगली आली नाहीत. मुग, उडीद आधीच गेले. सोयाबीनवर मोझॅक रोग पडला. पीकविमा कंपन्यांनी भरपाईची २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्यावी, असे सरकारने सांगूनसुद्धा पीक विमा कंपन्यांनी काहीही दिले नाही. सोयाबीनवर पडलेला मोझॅक रोग हा नैसर्गिक आपत्ती असताना पीक विमा कंपन्या ते मानण्यास तयार नाहीत.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून विमा कंपन्या सरकारची तिजोरी लुटण्याचा राजमार्ग वापरत आहेत. या योजनेत केंद्राचा हिस्सा, कंपन्यांचा हिस्सा व प्रत्यक्षात दिलेली भरपाई याचा हिशेब घेण्याची गरज आहे.

सुरत -चेन्नई हायवे मार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. कॉंग्रेसच्या जयराम रमेश यांनी बाजारभावाच्या चौपट मोबदला देण्याचे आदेश काढले असताना कॉंग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी दुरुस्ती करुन मोबदला कमी केला अशी टीका त्यांनी केली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे, शिवाजी पाटील, नरेंद्र पाटील, मोहसीन पटेल, डॉ. दत्तात्रय पांढरे आदी उपस्थित होते.

तेलंगण पॅटर्न म्हणजे वरवरची मलमपट्टी

यावेळी तेलंगण पॅटर्नवर बोलताना श्री. शेट्टी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी तेलंगण पॅटर्नची चर्चा होत आहे. पण प्रत्यक्षात ही शेतकऱ्यांच्या मुळ दुखण्यावर इलाज नाही तर वरवरची मलमपट्टी आहे. किमान वेतन कायद्यानुसार किमान हमीभाव कायदा करावा लागणार आहे. तसेच त्याच्या पिकाला विमा संरक्षण या दोन गोष्टी केल्याशिवाय शेतकऱ्यांची अडचण सुटणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT