suresh gambhire sakal
सोलापूर

Akluj News : धर्माच्या भिंती तोडून २५ वर्षांपासून रमजान महिन्याचे रोजे करणारा अवलिया

अकलूजच्या सुरेश गंभिरे यांचा सर्वधर्मसमभावाचा संदेश

सकाळ वृत्तसेवा

अकलूज - भारतात अनेक धर्मांचे लोक पिढ्यान्‌पिढ्या एकत्र राहात आहेत. मात्र, अनेक ठिकाणी स्वहितासाठी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. असे असताना जातीपातीच्याच नव्हे तर धर्माच्या भिंती तोडून अकलूजमधील एका हिंदू बांधवाने गत पंचवीस वर्षांपासून अखंडपणे रमजान महिन्याचे रोजे धरून समाजासमोर सर्वधर्मसमभावाचा आदर्श निर्माण केला आहे.

अकलूज येथील सुरेश शिवाजी गंभिरे हे वयाच्या २८व्या वर्षापासून मुस्लिम समाजाचे रमजानचे संपूर्ण महिन्याचे रोजे करतात. गेली २५ वर्षे त्यांचे हे कार्य अखंडपणे चालू आहे. सुरेश हे अनेक वर्षांपासून अकलूजमधील रामायण चौकात राहतात. त्यांच्या शेजारी हिंदूंबरोबरच अनेक मुस्लिम कुटुंबंही राहात आहेत.

शेजारी राहणाऱ्या या मुस्लिम कुटुंबांशी पिढ्यान्‌पिढ्या संबंध असल्याने त्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. सुरेश गंभिरे यांच्या वडिलांचे त्यांच्या समवयस्क मुस्लिम बांधवांशी मैत्रीचे संबंध होते. ते सर्वजण एकमेकांच्या धर्माचा आदर करून त्यांच्या सर्व सण- उत्सवात सहभागी होत होते. यामुळे सुरेश गंभिरे यांना लहानपणापासूनच मुस्लिम समाजाचे रीतिरिवाज, सण- उत्सवाबद्दल कुतूहल निर्माण झाले होते.

हल्लीच्या युगात अनेक तरुण स्वधर्माचे आचरण करण्यास टाळाटाळ करत असतात; मात्र सुरेश गंभिरे यांनी मुस्लिम समाजाचे रोजे करून रोजाचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. त्यांचे हे कार्य स्वतःच्या हितासाठी परधर्मावर टीका- टिप्पणी करणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन टाकण्यासारखे आहे. जगाला सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या आपल्या देशाला आज अशाच युवकांची गरज असून, अशा युवकांमुळे समाजातील जातीय विषमतेची दरी दूर होण्यास मदत होणार आहे.

सहेरीला फक्त एक खजूर अन्‌ दोन चमचे दही

मुस्लिम धर्मात रमजानचे रोजे केले जातात; परंतु त्यासाठी पहाटे उठून सहेरी करणे म्हणजेच अल्पोपाहार घेणे अनिवार्य असते. मात्र सुरेश गंभिरे हे सहेरीला फक्त एक खजूर आणि दोन चमचे दही घेऊन रोजाला प्रारंभ करतात. विशेष म्हणजे आज अशा रखरखत्या उन्हात केवळ एक खजूर आणि दोन चमचे दहीवर दिवसभर रोजा (उपवास) करणे म्हणजे जिकिरीचे आणि आव्हानात्मक आहे.

लहानपणापासून मुस्लिम समाजातील बांधवांबरोबर घनिष्ठ संबंधांमुळे त्यांच्या सणांबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले होते. त्यामुळे रोजा करण्याचे मी ठरविले. त्यास आई मालन, पत्नी ऊर्मिला व दोन्ही मुलांनी वेळोवेळी प्रोत्साहनच दिले.

- सुरेश गंभिरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Uruli Kanchan Crime : विनयभंग करत महिलेला जातिवाचक शिवीगाळ; खासगी सावकारावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

SCROLL FOR NEXT