मुस्लिम धर्मात अधिकृत तर हिंदू धर्मातील लोकांना अनधिकृत बायका : रामदास आठवले
मुस्लिम धर्मात अधिकृत तर हिंदू धर्मातील लोकांना अनधिकृत बायका : रामदास आठवले Gallery
सोलापूर

मुस्लिम धर्मात अधिकृत तर हिंदू धर्मातील लोकांना अनधिकृत बायका : रामदास आठवले

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

रामदास आठवले म्हणाले, देशाच्या हितासाठी समान नागरी कायदा आवश्‍यक आहे. मुस्लिम समाजाने या कायद्याविषयी उगाच बाऊ करण्याची गरज नाही.

पंढरपूर (सोलापूर) : मुस्लिम धर्मात (Muslim religion) अधिकृत तर हिंदू धर्मातील (Hindu religion) लोकांना अनधिकृत बायका असतात. मुस्लिम समाजातील लोकांना दोन-दोन बायका असतात पण त्या अधिकृत असतात; परंतु हिंदू धर्मातील काही लोकांना अनधिकृत बायका असतात, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केले. आठवले यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. आठवले हे पंढरपूर (Pandharpur) दौऱ्यावर आले होते. येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी लोकसंख्या वाढीविषयी चिंता व्यक्त करत समान नागरी कायद्याला आपला पाठिंबा असल्याचेही स्पष्ट केले.

ते म्हणाले, देशाच्या हितासाठी समान नागरी कायदा आवश्‍यक आहे. मुस्लिम समाजाने या कायद्याविषयी उगाच बाऊ करण्याची गरज नाही. कोणत्याही एका धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात हा कायदा नाही. समान नागरी कायद्यामुळे आरक्षणाला धक्का लागणार नाही. वाढती लोकसंख्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला मारक ठरत आहे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात लोकसंख्या वाढ अधिक आहे. 100 कोटीवरून ती आता 150 कोटींपर्यंत गेली आहे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनच्या धर्तीवर कुटुंब नियोजनचा कायदा करण्याची आवश्‍यकता आहे. जागतिक लोकसंख्या वाढीच्या तुलनेत भारतात लोकसंख्या वाढीचा वेग अधिक आहे. अलीकडच्या काही वर्षात तो अधिक वाढला आहे. लोकसंख्या वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनच्या धर्तीवर एक कुटुंब, एक मुल असा कुटुंब नियोजनाचा नवा कायदा करण्याची गरज आहे.

ते पुढे म्हणाले, राज्याच्या विकासासाठी भाजप आणि शिवसेनेने एकत्र येण्याची गरज आहे. उर्वरित अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा. यासाठी आरपीआय म्हणून मी सातत्याने प्रयत्नशील आहे; परंतु यश येत नाही. शिवसेना-भाजप एकत्र आले तर ते दोघांच्याही हिताचे ठरणार आहे, असेही आठवले यांनी नमूद केले.

या वेळी आरपीआयचे राजा सरवदे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, सुनील सर्वगोड, दीपक चंदनशिवे, संतोष पवार, आशीत गांगुर्डे, चंद्रकांत वाघमारे, दया धाईंजे, एन. के. साळवे, नंदू केंगार, कीर्तिपाल सर्वगोड आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare : "मिस्टर राज, तुम्हाला माझ्या नावाची सुपारी..." सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडीओवरून हल्लाबोल

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

IPL 2024 RCB vs DC : आरसीबीची विजयी पंचमी; दिल्लीच्या पराभवाने पॉईंट टेबल झालं रंजक

SCROLL FOR NEXT