robot2.jpg
robot2.jpg 
सोलापूर

हॉस्पिटल रोबोटची कोरोना उपचारात महत्वाची भुमीका कशी? ते वाचा 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात रोटरी क्‍लबने रुग्णसेवेसाठी निशुल्क उपलब्ध केलेले तीन कोरोना फायटर जीवन रोबोट रुग्ण व डॉक्‍टरांच्या मध्ये उत्तम संवादक व वाहक म्हणून काम करीत आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रसारावर उपचार करणारे डॉक्‍टर व परिचारिकांना रोबोटचे संरक्षण मिळाले आहे. बेडवर एकाकी असलेल्या रुग्णांना त्यांच्या घरच्यांशी संवाद साधण्याची संधी या रोबोटद्वारे उपलब्ध झाली आहे. 

येथील रोटरी क्‍लबचे बी. एस. मुंदडा व पदाधिकाऱ्यांनी कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारात डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे यादृष्टीने विचार केला होता. तेव्हा रोबोटीक्‍सचे तज्ञ असलेले शैलेश थिगळे, जय व यश थिगळे यांनी कोरोना फायटर रोबोटची निर्मीती करण्यास सुरवात केली. श्री. थिगळे हे रोबोटीक्‍स व न्यु एज कॉम्प्युटर संस्थेचे संचालक असून त्यांचा मुलगा जय व यश थीगळे हे रोबोट बनवण्याचे काम करतात. यापुर्वी कारखान्यात पीक अँड प्लेस कार्यपध्दतीचे रोबोट उपयोगी पडत होते. मात्र कोरोना उपचारासाठी त्यांना मुव्हेबल व संवाद घडवून देणारे रोबोट तयार करणे आवश्‍यक होते. तसेच हे रोबोट वायरलेस व सेन्सर पध्दतीने बनवणे आवश्‍यक होते. 

हार्डवेअरसाठी लागणारे स्पेअर पार्टस उपलब्ध झाल्यानंतर सॉफ्टवेअर साठी जय थिगळे यांनी स्वतंत्र ऍप डेव्हलप केले. या रोबोटद्वारे व्यक्ती संपर्क न होता अैाषधी, भोजन व नाश्‍ता रुग्णांपर्यंत पोचवणे, डॉक्‍टरांना व्हिडीओ कॉलद्वारे रुग्णांशी संवाद साधून दिला जातो. रुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलता यावे यासाठी एक मोबाईल जोडला आहे. डॉक्‍टर रोबोटच्या व्हिडीओ कॉलद्वारे रुग्णांना त्यांच्या आजाराची चौकशी व गोळ्या घेण्याबद्दल सुचना देतात. 


रोबोटची तांत्रिक वैशिष्ट्ये 
पहिला हॉस्पिटल रोबोट 
ऍटो पॉवर प्रोटेक्‍शन बेस 
स्मार्ट फोनचा संवादासाठी उपयोग 
ऑटो सेन्सरद्वारे ऑबस्टॅकल डिटेक्‍शन 
वायरलेस रोबोट 

कोरोना संसर्ग टाळण्याचा प्रयत्न 
पहिला रोबोट दिल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्याचा उपयोग करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. नंतर रुग्णांची संख्या वाढल्याने आणखी दोन रोबोट वार्डात उपलब्ध करून दिले आहेत. 
- बी. एस. मुंदडा, अध्यक्ष रोटरी क्‍लब ऑफ सोलापूर 

सुरक्षितता ठरते महत्वाची 
कोरोना संसर्गात औषधीसेवा व संवाद या दोन्ही गोष्टी रोबोटद्वारे रुग्ण व डॉक्‍टरांना सुरक्षित अंतरावरून मिळाव्यात हा उद्देश या रोबोटमुळे उपलब्ध झाला आहे. 
- शैलेश थिगळे, संचालक न्युएज कॉम्प्यूटर्स. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT