Read the instructions given by the government regarding the use of the Zoom app 
सोलापूर

झूम ॲप वापरताय?; सुरक्षेसाठी सरकारने दिलेत ‘हे’ पर्याय अन्‌...

अशोक मुरुमकर

सोलापूर : ‘झूम’ ॲपबद्दल सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेकदा प्रश्‍न चिन्ह निर्माण केले आहेत. आता सरकारनेच हे ॲप सुरक्षित दिसत नसल्याचे जाहीर केले असून याला पर्याय दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालय आणि सीईआरटी- आय ने झूम क्लाउड मिटींग ॲप सुरक्षित दिसत नाही. त्याऐवजी ‘स्कायॲप’, ‘व्हॉट्‌सअप व्हीसी’, ‘गुगल टीम’ आदींचा वापर करण्यास सुचवले आहे. याबाबतचे पत्रक सोलापूर पोलिस आयुक्तालयाने त्यांच्या ट्विटरवर टाकले आहे.

ज्या कंपन्या किंवा व्यक्तींना व्यापारासंदर्भात हे ॲप वापरायचे आह, त्यांच्यासाठी काही सुरक्षित सूचनाही दिल्या आहेत. यामध्ये म्हटलंयं की, ज्यात कोणतीही गोपनीय माहिती सामायिक केलेली नाही किंवा इतर पर्याय उपलब्ध नसल्यास विना- खासगी संमेलनासाठी किंवा सार्वजनिक ऑनलाइन सेमिनारसाठी झूम ॲप वापरले जाऊ शकते. प्रतिक्षा कक्ष तयार करा, प्रत्येक वेळी नवीन मिटींग आयडी व पासवर्ड वापरा, फक्त अधिकृत वापर करते सामील होऊ शकतात अशी सेटींग करा, मिटींग सुरु झाल्यावर लॉक करा, त्यामुळे नवीन व्यक्ती सहभागी होऊ शकणार नाही, खासगी संभाषण बंद ठेवा, अपण अनओळखींना काढून टाकू शकता. स्क्रीन शेअरींग आणि संमेलनाच्या मिटींगचे रेकॉर्डिंगवर प्रतिबंधंधित करा. सहभागींना त्यांच्या आयडीचे नाव बदलून देऊ नका आदी सूचना पत्रकाद्वारे दिल्या आहेत.
देशात वाढणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'लॉकडाउन' करण्यात आला. त्यामुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद आहेत. आता त्यात शिथीलता आणली असली तरी अनेक मिटींग व कामे ॲपद्‌वारे होत आहेत. नोकरदार वर्गालाही लॉकडाऊनदरम्यान घरून ऑनलाइन काम करावे लागतंय. याच 'वर्क फ्रॉम

होम'मध्ये चर्चेत अलेलं ॲप म्हणजे झूम मोबाइल ॲप. याच्या सुरक्षीतेवर प्रश्‍न चिन्ह निर्माण केले जात आहे. अनेक माध्यमांमध्ये यावर उलटसुलट चर्चाही झाली.
'झूम'च्या यंत्रणेमध्ये काही त्रुटी आहेत. 'झूम'चे विंडोज्, अँड्रॉइड आणि आयओएस असे व्हर्जन असून, त्यात प्रत्येकांत काही ना काही चुका आहेत. काही महिन्यांपूर्वीच आयओएस व्हर्जनमध्ये एका मोठ्या त्रुटीसाठी 'झूम'चे संस्थापक एरिक युआन यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यांच्या या माफीनाम्यानंतर अॅपमध्ये बदल करण्यात आले. 'झूम'मधील सर्वांत मोठी आणि त्रासदायक त्रुटी म्हणजे व्हॉट्सअॅपप्रमाणे यात 'एंड टू एंट इन्क्रिप्शन' (End - to - End Encryption) नाही. म्हणजेच हॅक करायचे ठरवले, तर 'झूम' मीटिंगमध्ये चाललेला संवाद कधीही सार्वजनिक होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT