record of muharram of solapur in correspondence of Adil Shah Peshwa Sakal
सोलापूर

Solapur News : सोलापूरच्या मोहरमची आदिलशहा, पेशव्यांच्या पत्रव्यवहारात नोंद

सर्वधर्मीय सहभागाची परंपरा; तेलुगु भाषिकांमुळे पंजाची परंपरा

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सर्वधर्मीयांचा समावेश असलेली मोहरमची परंपरा शेकडो वर्षापासून शहरात राबवली जाते. आदिलशहा व पेशव्यांच्या पत्रव्यवहारात सोलापूरच्या मोहरमच्या सणाची नोंद आढळते. पूर्वी मोहरमचा सण हा शहरात थोड्या प्रमाणात केला जात असे.

तेलंगणातून आलेल्या तेलुगु भाषिक कामगारांनी सोलापुरात कामासाठी येत असताना मोहरमचे पंजे देखील सोबत आणले. नंतर त्यांनी शहराच्या परंपरेत सहभाग नोंदवला. स्थानिक लोकांमध्ये अन्य प्रांतातून आलेल्या लोकांनी देखील आजही त्यांचा सहभाग कायम ठेवला.

१९५६ च्या काळात मोहरम कमिटीची स्थापना झाली. या कमिटीने शहरातील विविध भागातील पंजे स्थापनेच्या परंपरेला शिस्तीचे स्वरूप दिले. धार्मिक विधीचे मार्गदर्शन करत असताना मिरवणुकीला लागणारी प्रशासनाची परवानगी, कायदा सुव्यवस्थेच्या कामाला मदत करून सण साजरा करणे ही कामे कमिटी करू लागली. या कमिटीने या उत्सवाला शिस्तबद्ध सामाजिक एकतेचे स्वरूप दिले.

मोहरमच्या सणात मुस्लिमाशिवाय अन्य धर्मीयांचा देखील मान असतो. आजही ही अन्य धर्मीयांचा सहभाग कायम राहिला आहे. थोरले मौलाली यांची सवारीचा मान शेटे वाड्याकडे आहे. तसेच मिरवणुकीत पहिला मान वडार व महार समाजाला दिलेला आहे.

भोई समाजाचा देखील मान असतो. आदिलशाहीच्या काळापासून मोहरम उत्सवाच्या नोंदी आहेत. आदिलशहा, पेशवे यांनी सणासाठी केलेल्या तरतुदीच्या नोंदी ऐतिहासिक कागदपत्रात आहेत. १९८२ मध्ये जातीय दंगलीची घटना करमाळ्यात घडल्यानंतर मोहरमचा सण व इतर सण एकत्र येत असताना कमिटीने मोहरमच्या मिरवणुका स्थगित करून प्रशासनाला सहकार्य केले.

- आम्ही दरवर्षी कमिटीकडून मोहरमचा सण आनंदात साजरा व्हावा, यासाठी काम करतो. सर्वधर्मीयांच्या सहभागाने सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा हा सण बनला आहे.

- मकबूल मोहोळकर,अध्यक्ष, मोहरम कमिटी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT