NTPC Solapur.jpg
NTPC Solapur.jpg 
सोलापूर

उत्पादन खर्चात कपात झाल्याने वीज दरात घट : सोलापूर एनटीपीसीच्या मुख्य सरव्यवस्थापकांची माहिती; सौरऊर्जा प्रकल्प उभारणार 

अभय दिवाणजी

सोलापूर : वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाहतुकीत कपात झाल्याने उत्पादन खर्च कमी झाला. बचत झाल्याने कमी दरात वीज पुरवठा करण्यात यश आला. त्यामुळे मागणीतही वाढ झाल्याची माहिती सोलापूर एनटीपीसीचे सरव्यवस्थापक नामदेव उप्पार यांनी दिली. वाढत्या मागणीमुळे सोलापुरातील दोन्ही युनिट सुरू झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 23 आणि 40 मेगावॅट अशा दोन सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. 

एनटीपीसीच्या प्रकल्पात सोलापूरपासून दीड हजार किलोमीटर दूर असलेल्या ओडीसा राज्यातून येथून कोळसा आणून वीज निर्मिती केली जात होती. गेल्या सहा महिन्यांपासून तेलंगणातील सिंगरेनी येथील कोळसा खाणीतून म्हणजे 600 किलोमीटर अंतरावरून कोळसा मिळू लागला आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात मोठी कपात झाली. गेले कित्येक वर्षे युनिटमागे तीन रुपये 80 पैशांनी उत्पादित होत असलेल्या विजेचा उत्पादन खर्च एक रुपयाने कमी म्हणजे दोन रुपये 80 पैशांवर आला. वीज निर्मितीचा दर कमी झाल्याने एनटीपीसीकडून विजेच्या खरेदीची मागणी वाढली आहे. जुलैपासून उत्पादन खर्च कमी झाल्याने तब्बल 80 कोटी युनिटची विक्री झाली आहे. कोरोना कालावधीतही एनटीपीसीतून विद्युत निर्मिती होत होती. विजेला दिवाळीत आणखी मागणी वाढेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

सोलापूर एनटीपीसी परिसरात आगामी काळात 23 मेगावॅट व 40 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या व्यतिरिक्त सोलापूरच्या एनटीपीसीतून विज निर्मीती करण्यावेळी सल्फरडाय ऑक्‍साइडची मात्रा कमी करण्यासाठी एफजीडी (प्रणाली) नव्या तंत्रज्ञान प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी दोन नव्या चिमण्यांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यातील पहिले युनिट मार्च 2021 पर्यंत कार्यरत होईल तर दुसरे पुढील दीड वर्षात सुरू होण्याची शक्‍यता आहे. या दोन चिमण्यांमुळे पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यात येईल. हवेत उडणाऱ्या राख (ऍश) शून्य राहणाऱ्या प्रकल्पाचा हा प्रयोग राहील. सोलापूरच्या एनटीपीसी प्रकल्पातून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तिसगड, गोवा, दिव-दमण, दादरा-नगर-हवेली आदी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना वीज पुरवठा केला जात असल्याचे श्री. उप्पार यांनी सांगितले. 

सामाजिक वनीकरण विभागाशी दरवर्षी 50 हजार वृक्षलागवड करण्यासंदर्भात केलेल्या कराराप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात साडेतीन लाखांहून अधिक रोपांची लागवड करुन हरीत सोलापूरसाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या कालावधीत कोविड केअर सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्रास तसेच पोलिसांसाठी थर्मल स्कॅनर, वैद्यकीय साहित्याचे मास्क, सॅनिटायझर, हॅंडग्लोजचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनास पाच लाखांचा निधी दिल्याचे श्री. उप्पार यांनी सांगितले. सोलापूरला पाणी पुरवठ्याचा उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीकरीता एनटीपीसी व महापालिकेत झालेल्या 250 कोटींच्या सामंज्यस करारापैकी 5 कोटी रुपये एनटीपीसीने आदा केले. कामाच्या पुर्ततेप्रमाणे उर्वरीत रक्कमही आदा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

या पत्रकार परिषदेस सरव्यवस्थापक के. वेंकटय्या, अनिल कुमार, अनिल श्रीवास्तव, दीपक रंजन देहूरी, जनसंपर्क अधिकारी शरद शिंदे उपस्थित होते. 

विशेष... 

  •  लॉकडाऊन कालावधीत उद्योग बंद असल्याने मागणी कमी 
  • स्वस्तात वीज मिळू लागल्याने मागणीत वाढ 
  • दोन सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन 
  • देशभरात एनटीपीसीची 62 हजार 918 मेगावॅट निर्मिती क्षमता 
  •  2032 पर्यंत एनटीपीसीचे 130 गिगावॉट क्षमतेपर्यंत झेप घेण्याचे लक्ष्य 
  • वाहतूक खर्चात झालेल्या बचतीमुळे युनिटमागे एक रुपये खर्चात बचत 
  • सीएसआरमधून जवळची खेडी समृद्ध करण्याची योजना 
  • सोलापूर प्रकल्पात 250 कर्मचारी, 1500 कामगार कार्यरत 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT