Sarpanch 
सोलापूर

गणेशवाडी ग्रामपंचायतीची ट्रॅजेडी ! सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, मात्र त्या प्रवर्गाचा सदस्यच विजयी नाही

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सुरू झालेल्या निवडणुकीनंतर विविध ग्रामपंचायतींचे गमतीदार किस्से ऐकायला मिळत होते. निवडणुकीतील विजयाचा गुलाल बाजूला होऊन नऊ दिवसांचा कालावधी संपताच, सरपंच आरक्षणाची सोडत काल पार पडली. आरक्षण सोडतीत मंगळवेढ्यातील एका गावाबाबत अजबच प्रकार घडल्याचे दिसून आले. सोडतीत सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती राखीवसाठी निघाले; परंतु त्या प्रवर्गाचा उमेदवारच विजयी झाला नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या आशेवरच पाणी पडले आहे. 

मंगळवेढा तालुक्‍यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. सात जागांसाठी असलेल्या निवडणुकीत निर्माण झालेल्या चुरशीतून कौशल्या वाकडे, असीना शेख सुतार, दीपाली तानगावडे, द्रौपदी इंगोले, जयश्री पवार, अशोक तानगावडे, सुप्रिया तानगावडे हे सदस्य विजयी झाले आहेत. गावातील सत्तेवर तालुक्‍यातील राजकीय नेत्यांनी दावा केला होता. असे असले तरी कुणाच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडणार? याची उत्सुकता नवनिर्वाचित सदस्यांबरोबरच ग्रामस्थांमध्ये देखील होती. 

काल (बुधवारी) सकाळी साडेअकरा वाजता मंगळवेढा येथील तहसील कार्यालयात तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. तालुक्‍यातील 23 ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण निश्‍चित नसल्यामुळे यातील दहा गावे ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आली. त्या आरक्षण सोडतीत या गावांचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आले. परंतु निवडून आलेल्या सात सदस्यांपैकी अनुसूचित जातीचा एकही सदस्य ग्रामपंचायतीत नसल्याने या गावातील सरपंच पद रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मागील काही ग्रामपंचायतींचा अनुभव लक्षात घेता, गणेशवाडी ग्रामपंचायतीचा कारभार अखेरीस आता उपसरपंचाच्या गळ्यात पडणार आहे. 

दरम्यान, शासनाने केलेल्या जनगणनेमध्ये या गावात या प्रवर्गाची लोकसंख्या असताना प्रभाग रचना करताना या लोकसंख्येचा विचार प्रशासनाने का केला नाही, असा सवाल या निमित्ताने जनतेतून व्यक्त केला जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Accident: भीषण बस अपघात! जिवंत जळाले प्रवासी… एका क्षणात आनंदाचा प्रवास झाला मृत्यूचा थरार! Video पाहा

Latest Marathi News Live Update : नागपूर विद्यापीठात प्र-कुलगुरू नियुक्ती पुन्हा लांबणीवर, बैठक अचानक स्थगित

Aryaman Birla: आयपीएल खेळाडू ते संघाची मालकी; रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे संचालक आर्यमन बिर्ला यांचा प्रवास

Tamannaah Bhatia And Sidharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्रा तमन्ना भाटिया पुन्हा एकत्र, ‘व्वन’ चित्रपट २८ ऑगस्टला भेटीला!

Surgery Controversy: उलटी, तापातही शस्त्रक्रिया; प्राध्यापकाचा मृत्यू, साेलापूरात कॅशलेससाठी ऑपरेशनचा आरोप; महापालिका आरोग्य विभाग गप्प!

SCROLL FOR NEXT