सोलापूर

लस घेतल्यानंतर शरीराला नाणी चिकटण्याची घटना घडली पंढरपुरातही

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

श्री.कुलकर्णी यांनी लसीकरण केंद्रात असतानाच अंगाला नाणी चिटकतात का हे पाहिले तेंव्हा त्यांच्या अंगाला नाणी चिटकत असल्याचे दिसून आले.

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना (Corona) प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अंगाला नाणी, स्टीलचे चमचे चिटकवण्याची घटना नाशिक येथे निदर्शनास आली होती. तसाच अनुभव पंढरपूर येथील सेवानिवृत्त तलाठी नरहरी कुलकर्णी (Retired Talathi Narhari Kulkarni) यांना आला. (Retired Talathi Narhari Kulkarni from Pandharpur has coins stuck to his body after he was vaccinated)

येथील कुंभारघाटा लगत माळशिरस येथून सेवानिवृत्त झालेले तलाठी नरहरी कुलकर्णी (वय 64) राहतात. 20 मार्च रोजी त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांनी येथील अरिहंत पब्लिक स्कूल मधील लसीकरण केंद्रावर जाऊन दुसरा डोस घेतला. लसीकरणासाठी ते एकटे गेले होते. लस घेतल्यानंतर अंगाला नाणी चिटकल्याची बातमी त्यांनी टिव्हीवर पाहिली होती. त्यामुळे उत्सुकतेपोटी लस टोचून घेतल्यानंतर श्री.कुलकर्णी यांनी लसीकरण केंद्रात असतानाच अंगाला नाणी चिटकतात का हे पाहिले तेंव्हा त्यांच्या अंगाला नाणी चिटकत असल्याचे दिसून आले.

त्यानंतर घरी आ ल्यावर त्यांनी अंग पुसून पुन्हा अंगाला नाणी आणि स्टीलचे चमचे चिटकतात हे पाहिले तेंव्हा चिटकत असल्याचा अनुभव त्यांना आला. सायंकाळ नंतर मात्र नाणी व चमचे चिटकणे बंद झाले. कोणताही त्रास झाला नाही. डाॅक्टरांकडे देखील जावे लागले नाही. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे असे असे श्री.कुलकर्णी यांनी सांगितले.

या घटनेसंदर्भात येथील काही डॉक्टरांना विचारले असता ते म्हणाले, अशा घटनेला शास्त्रीय आधार नाही. लस दिल्यानंतर चुंबकत्व जनरेट होत आहे का हे मोजण्यासाठी काही सेंसिटिव उपकरणे आहेत. त्याच्या सहाय्याने शास्त्रीय तपासणी झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. (Retired Talathi Narhari Kulkarni from Pandharpur has coins stuck to his body after he was vaccinated)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT