corona
corona 
सोलापूर

सोलापूरच्या ग्रामीणमध्ये 1763 चाचण्यांमध्ये आढळले 121 कोरोना बाधित 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 1 हजार 763 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 642 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 121 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 251 जण एकाच दिवशी कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनामुळे दहा जणांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

ग्रामीण भागातील एकूण बाधित व्यक्तींची संख्या आता 29 हजार 248 झाली आहे. रुग्णालयात सध्या 3 हजार 312 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 852 जणांचा मृत्यू झाला असून 25 हजार 214 जण कोरोना मुक्त झाले आहेत. आजच्या अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तींमध्ये माढा तालुक्‍यातील शिराळ येथील 73 वर्षिय पुरुष, पंढरपुरातील नाथ चौकातील 62 वर्षिय पुरुष, मोहोळ तालुक्‍यातील टाकळी सिकंदर येथील 65 वर्षिय पुरुष, पंढरपुरातील बडवे चाळ झोपडपट्टी येथील चाळीस वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील नवीन विडी घरकुल येथील 47 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील नातेपुते येथील 72 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मंद्रूप येथील 18 वर्षीय महिला, माळशिरस तालुक्‍यातील श्रीपूर येथील 55 वर्षिय पुरुष, मोहोळमधील बागवान चौक येथील 59 वर्षिय पुरुष, माढा तालुक्‍यातील कुर्डूवाडी येथील 54 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे 39 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. 

माढा तालुक्‍यातील मृतांचा आकडा 100 
माढा तालुक्‍यात आत्तापर्यंत 2 हजार 980 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 100 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 2 हजार 546 जण कोरोना मुक्त झाले आहेत. रुग्णालयात सध्या 334 जणांवर उपचार सुरू आहेत. माळशिरस तालुक्‍यातील एकूण बाधितांची संख्या 5 हजार 67 झाली असून 98 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 4 हजार 567 कोरोना मुक्त झाले असून 402 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT