Gold Price  sakal
सोलापूर

रशिया युक्रेन युद्धाचा सोन्याच्या दरावर परिणाम; तोळ्याला एक हजारांनी घट

युद्ध सुरूच राहिल्यास सोन्याचे भाव ५४ हजार रुपयांच्या वर जातील असा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : रशिया-युक्रेन युद्धाला सुरवात होताच सोन्याचे भाव कडाडले असले तरी मागील चोवीस तासात ५२ हजार २०० रुपयांवर गेलेले भाव शुक्रवारी (ता. २५) ५१ हजार २०० रुपये म्हणजे एक हजार रुपयांनी कमी झाले. युद्ध सुरूच राहिल्यास सोन्याचे भाव ५४ हजार रुपयांच्या वर जातील असा अंदाज आहे.

मागील आठवड्यापासून सोन्याच्या भावावर युद्धाचे परिणाम दिसू लागले आहेत. शेअर बाजाराच्या पाठोपाठ पुन्हा एकदा सोन्याच्या बाजाराला फटका बसला आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरली आहे. त्यासोबत इंधन, शेअर बाजार याही क्षेत्रावर विपरित परिणाम दिसू लागले आहेत. सोन्याच्या बाजारावरदेखील परिणाम झाले आहेत. अजूनही सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्‍यता आहे. लग्नसराईच्या आणखी चार तारखा शिल्लक राहिल्या आहेत. लग्नसराईचा खरेदीचा हंगाम बऱ्यापैकी संपत चालला आहे. पण गुंतवणूकदार मात्र वाढत्या दराच्या संधीचा लाभ घेण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय तारण व मोडीचे व्यवहार देखील वाढण्याची चिन्हे आहेत. पूर्वी कमी दराने घेतलेले सोने जादा किमतीने मोडीत काढण्याचे व्यवहार वाढत चालले आहेत.

ठळक बाबी

  • लग्नसराईला भाववाढीचा फटका नाही

  • ५२ हजारांपेक्षा अधिक गेलेले भाव ५१ हजार ७०० पर्यंत कमी झाले

  • युद्ध, इंधन, गोल्ड करन्सी, डॉलर- रुपया समीकरण ही मुख्य कारणे

  • लग्नसराईच्या चार तारखा शिल्लक

  • गुंतवणूकदारांचे भाववाढीवर लक्ष

  • सर्वसामान्यांचे मोड व तारण व्यवहार वाढीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT