sangola city spray by disinfectant
sangola city spray by disinfectant 
सोलापूर

सांगोला शहर जंतुनाशक फवारणीने केले स्वच्छ

सकाळ वृत्तसेवा

सांगोला (सोलापूर) : कोरोनाच्या पा्श्वभुमीवर संपुर्ण सांगोला शहर चक्क दोन वेळा जंतुनाशक फवारणीने स्वच्छ करण्यात आले. ब्लोअर यंत्रणा लावून शहरात झालेल्या जंतुनाशक फवारणीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ही आगळी कामगीरी घडून येण्यासाठी नगरपालीकेने पुढाकार घेतला. सांगोला शहराची लोकसंख्या ३४ हजार एवढी आहे. तालुक्याचे गाव असलेल्या या शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरु केले.
 शहरात फवारणीसाठी त्यांनी सोडीयम हायपो क्लोराईट हे रसायन वापरण्याचे ठरवले.  संपुर्ण शहरात एकाचवेळी फवारणी करायची तर ब्लोअर पंपाची गरज होती. तसेच त्यासाठी परिसरातील शेतकर्यांनी त्यांचे ट्रॅक्टर देऊ केले. त्यांच्या मदतीने संपुर्ण शहर पहील्या टप्प्यात फवारण्यात आले. छोट्या गल्लीबोळात दुचाकीसारखी वाहने वापरून त्यांच्या मदतीने फवारणी हातपंपाने करण्यात आली. पहील्या फवारणीने संपूर्ण शहर निर्जंतूक करण्यात आले.
पालिकेने घेतलेला पुढाकार पाहून नंतर पून्हा भाजपाचे पदाधिकारी सरसावले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने स्वच्छता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. 
या पार्श्‍वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष, नगरसेवक चेतनसिंह ऊर्फ बाळासाहेब केदार-सावंत यांनी स्वखर्चातून सांगोला शहरात पाच ट्रॅक्‍टरच्या माध्यमातून ब्लोअरद्वारे जंतुनाशकाची फवारणी करत सांगोला शहर निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला आहे. 
राज्यात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून भाजपचे तालुकाध्यक्ष नगरसेवक चेतनसिंह केदार-सावंत यांनी संपूर्ण सांगोला शहर निर्जंतुकीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोमवारी नगरसेवक चेतनसिंह ऊर्फ बाळासाहेब केदार-सावंत यांनी स्वखर्चातून पाच ट्रॅक्‍टरच्या माध्यमातून ब्लोअर मशिनद्वारे शहरात जंतुनाशकाच्या फवारणीचा प्रारंभ केला. या वेळी भाजपचे शिवाजीराव गायकवाड, नगरसेवक जुबेर मुजावर, रफिक तांबोळी, राजू मगर, शाहरुख तांबोळी, आरोग्य निरीक्षक संजय दौंडे, दीपक केदार, सुनील केदार, रोहित सावंत आदी उपस्थित होते. नगरसेवक चेतनसिंह केदार सावंत यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक केले जात आहे. 

सांगोला शहर निर्जंतुकीकरण

कोरोनासारख्या महाभयंकर संसर्गजन्य रोगास आळा घालण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. संपूर्ण सांगोला शहर निर्जंतुकीकरण करण्याचे काम मी स्वखर्चाने करणार आहे.

- चेतनसिंह केदार, तालुकाध्यक्ष, भाजप, सांगोला 
 

     
   
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT