Sangola municipalty will provide capital loans to street vendors
Sangola municipalty will provide capital loans to street vendors 
सोलापूर

कोरोनामुळे डबघाईला आलेल्या फेरीवाल्यांच्या मदतीला सरसावली सांगोला नगरपालिका 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सांगोला नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व फेरीवाले, फळविक्रेते, पथविक्रेते यांना लॉकडाउन काळात मोडकळीस आलेल्या व्यवसायांना पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र पुरस्कृत 'पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी' (पीएम स्वनिधी) या योजनेअंतर्गत दहा हजार रुपये खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. शहरातील पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात डबघाईस आलेल्या पथ विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पूरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता (आत्मनिर्भर निधी) या योजनेची शहरात सांगोला नगरपरिषदेच्या वतीने प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या अंतर्गत पथ विक्रेत्यांना विशेष सुक्ष्म पतपुरवठा केला जात असून बॅंकेच्या सहाय्याने अशा पथ विक्रेत्यांना विना तारण दहा हजार रुपये खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले जात आहे. यामध्ये भाज्या, फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा, भजी-वडापाव, अंडी, कापड वस्तू, चप्पल, पुस्तके, स्टेशनरी इत्यादी विक्रेत्यांचा समावेश आहे. तसेच केशकर्तनालय, चर्मकार, पान दुकान, लॉंड्री दुकान त्यांचाही समावेश असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महा ई-सेवा केंद्रातून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ही योजना 24 मार्च 2020 रोजी व त्यापूर्वी विक्रीकरिता असलेल्या सर्व पथ विक्रेत्यांना लागू आहे. 27 सप्टेंबर 2020 अखेर सांगोला शहरातील सुमारे 180 शहरी फेरीवाल्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 78 व्यक्तींचे अर्ज प्रस्ताव बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा यांनी मंजूर करून त्या व्यक्तींना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे सात लाख ऐंशी हजार रुपये एवढी कर्ज रक्कम बॅंकांनी मंजूर केलेले 12 लाभार्थीच्या खात्यात दहा हजार रुपयांप्रमाणे एक लाख 20 हजार रुपये एवढी कर्ज रक्कम जमा करण्यात आलेली आहे. कर्जाची नियमित परतफेड केल्यास सात टक्के व्याजात सूट व पुढे मोठे भांडवली कर्ज देण्यात येईल. तसेच लाभार्थींनी डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅक ऑफर देखील दिली जाणार आहे. 
सांगोला नगरपरिषदेच्या वतीने "पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी" (पीएम स्वनिधी योजना) या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. लॉकडाउन काळामध्ये व्यवसाय विस्कळीत झालेल्या पथ विक्रेत्यांना या योजनेमुळे नवीन उभारी मिळणार असून जास्तीत जास्त पथ विक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. नगरपरिषदेच्या वतीने शहरात या योजनेची सविस्तर माहिती व मार्गदर्शनाचे कार्य योगेश गंगाधरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (मोबाईल क्रमांक - 9970613961) हे करीत आहेत, असे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT