सोलापूर

निकालानंतरही मिळेना गुणपत्रिका...'हे' विद्यापीठ पुन्हा चर्चेत 

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर प्रथमच विद्यापीठाने एक कोटी रुपयांची निवीदा काढून नवे शैक्षणिक साहित्य छपाई सुरु केली आहे. वास्तविक पाहता 30 दिवसात निकाल अपेक्षित असतानाही मागील 31 दिवसांत विद्यार्थ्यांना ना प्रोव्हिजनल ना मूळ गुणपत्रिका मिळाली. ऑनलाइन निकालानंतरही गुणपत्रिका न मिळाल्याने जॉबसाठी अर्ज करता येत नसल्याचे गाऱ्हाणे विद्यार्थ्यांनी मांडले. 


सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व रोजगारासाठी ठोस प्रयत्न होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, नापास विद्यार्थ्यांना वशिलेबाजीने व आर्थिक व्यवहार करुन काही विद्यार्थ्यांना पास केले. तसेच विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नापास नातेवाईकास पास करण्याचेही प्रकार केले आहेत. तरीही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे कामकाज सुधारेल, अशी अपेक्षा असतानाही निकालानंतरही गुणपत्रिका वेळेत मिळत नसल्याने विद्यापीठाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. स्पर्धेच्या काळात रोजगारासाठी विद्यार्थ्यांना विविध उद्योजकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. काहींना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगाराचे आश्‍वासन मिळाले मात्र, गुणपत्रिकेअभावी तीही संधी गमवावी लागत आहे. 


प्रोव्हिजनल गुणपत्रिकेसाठी अर्ज करा 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या 350 विविध विषयांचे निकाल मागील महिनाभरात जाहीर झाले आहेत. त्यानुसार ऑनलाइन निकाल विद्यापीठाच्या वेबसाईटवर सोडले असून महाविद्यालयांनाही त्याची माहिती दिली असून काही दिवसांत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल गुणपत्रिका हवी असेल, त्यांनी विद्यापीठाकडे मागणी केल्यास गुणपत्रिका उपलब्ध करुन दिली जाईल. 
- डॉ. श्रेणीक शहा, परीक्षा नियंत्रक, सोलापूर विद्यापीठ 

कोणीही आले तरी सुधारेना परीक्षा विभाग 
परीक्षेवेळी प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिका विलंबाने विद्यार्थ्यांना मिळणे, निकालावेळी गुणपत्रिकेत त्रुटी, उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनाला विलंब, नापास विद्यार्थ्यांना पास करणे, गुणांच्या बेरजेत घोळ, यामुळे सोलापूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग सातत्याने चर्चेत आहे. विद्यापीठ स्थापनेपासून आतापर्यंत परीक्षा विभागाला पाच अधिकारी मिळाले. मात्र, परीक्षा विभागातील घोळ कायम आहे. आता ऑनलाइन निकाल लागला मात्र, विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाच न मिळाल्याने परीक्षा विभाग पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31,000 खाली; ऑक्टोबरमध्येही घसरण कायम, ताजा भाव किती?

Tiger Death: जंगलातून शेतापर्यंत वाघांचा पाठलाग; झुंजीत नर वाघाचा मृत्यू झाल्याचा वनविभागाचा अंदाज

Ramdas Athawale: बारा वर्षांनंतरही सत्तेत योग्य वाटा नाही; रिपाइं आठवले गटाला संधीची प्रतीक्षा, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

Latest Marathi News Live Update : एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार? अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता

Success Story: सकाळी ५ वाजता ग्राउंड अन् रात्रीपर्यंत अभ्यास; वैशालीने जिद्दीने मिळवली कारागृह पोलिसाची वर्दी, शेतकरी कुटुंबातील लेकीची प्रेरणादायी भरारी..

SCROLL FOR NEXT