shevre agri land killing case accused surrended him self akluj police station solapur crime Sakal
सोलापूर

Solapur Crime : शेवरे खूनप्रकरणातील दोघांना अटक; एकास सोमवारपर्यंत पोलिस कोठडी, स्थानिक गुन्हे शाखेची मदत

या खून प्रकरणातील आरोपी मंगळवारी अकलूज येथील पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाला

सकाळ वृत्तसेवा

टेंभुर्णी : शेवरे येथे शेतीच्या कारणावरून पुतण्याने चुलत्याच्या गळ्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून खून केल्याप्रकरणी सोमवारी रात्री चार आरोपींपैंकी एक आकाश जाधव (वय ३०) यास अटक केली असून, त्यास माढा न्यायालयात हजर केले असता सोमवार (ता.१८) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश माढा न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

तर मंगळवारी आरोपी शिवाजी जाधव (वय २७) स्वतः अकलूज पोलिस ठाण्यात हजर झाला असून, त्यास ताब्यात घेऊन टेंभुर्णी पोलिसांनी रात्री अटक केली आहे.

यातील मयत शंकर जाधव यांचे धडावेगळे केलेले शीर सोमवारी सायंकाळी पोलिसांना मिळाल्यानंतर मंगळवारी शवविच्छेदन होऊन दुपारी शेवरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची माहिती समजताच टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गिरीश जोग व त्यांचे सहकारी घटनास्थळी आले.

उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची आरोपींना शोधण्यासाठी मदत घेण्यात आली. मंगळवारी सकाळी शंकर जाधव यांच्या मृतदेहाचे टेंभुर्णीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात येऊन दुपारी शेवरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी या गुन्ह्यातील आकाश बाबासाहेब जाधव (वय ३०) यास पकडून टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी आकाश जाधव यास अटक करून माढा न्यायालयात हजर केले असता, माढा न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. व्ही. गांधे यांनी आरोपीस सोमवार (ता.१८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

अकलूज पोलिस ठाण्यात आरोपी स्वतः हजर

या खून प्रकरणातील आरोपी शिवाजी जाधव (वय २७) हा मंगळवारी अकलूज येथील पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाला. यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली नंतर त्यास रात्री अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT