Shri Ram Janmotsav Maha Aarti and procession at Akkalkot
Shri Ram Janmotsav Maha Aarti and procession at Akkalkot sakal
सोलापूर

अक्कलकोट येथे श्रीराम जन्मोत्सव महाआरती व शोभायात्रेने उत्साहात संपन्न

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट : अक्कलकोट येथे श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव विविध धार्मिक उपक्रमाने व शहरातील भव्य शोभायात्रेने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या जन्मोत्सव समितीत सर्व पक्षाचे कार्यकर्ते व सर्व समाजातील नागरिक सहभागी झाल्याने यावेळी एक आगळ्यावेगळ्या स्वरूपात रामनवमी साजरी झाली.या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील 90 चौकात श्रीराम प्रतिमेचे स्वयंस्फूर्त पूजन,मल्लिकार्जुन मंदिराजवळ झालेली महाआरती, शहरातील अनेक चौकातून काढलेली भव्य शोभायात्रा,रांगोळी,मिरवणुकीत सर्वत्र झालेली पुष्पवृष्टी यामुळे आज अक्कलकोट शहरात सर्वत्र श्रीराम जन्मोत्सव अनोखा उत्साह पहावयास मिळाला.

आज सकाळी मल्लिकार्जुन मंदिराजवळ जवळपास तीन हजार युवक व श्रीराम भक्त एकत्र येऊन तिथे सामूहिक महाआरती करण्यात आली त्यावेळी रामनामाचा गजर करण्यात आला.त्यानंतर शिस्तबद्ध रीतीने काढलेल्या शोभायात्रेत बँडपथक,हलगी संघ,तुतारी संघ,भगवा ध्वज वाहक आदी देखावे आणि पारंपरिक वाद्य लावण्यात आले होते.महाआरती नंतर नुकतेच सशस्त्र सीमा बल मध्ये निवड झालेल्या दहिटणे गावच्या पल्लवी दत्तण्णा घोडके या तरुणीचे समितीकडून सत्कार करण्यात आले.

शहरातील प्रमुख मार्गावरून जय श्रीराम, भारत माताकी जय, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी असे घोषणा देत शोभायात्रा मल्लिकार्जुन मंदिरवरून हन्नूर चौक,कारंजा चौक,भारत गल्ली,राम गल्ली,फत्तेसिंह चौक,मेन रोड,मंगरुळे पंप चौक, विजय चौक मार्गे मध्यवर्ती जन्मोत्सव ठिकाणी महाप्रसाद वाटप करून वंदे मातरम गीताने शोभायात्रेची सांगता झाली. सदर शोभायात्रेत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह सर्व राजकीय पक्षातील नेते तसेच तीन हजार लोकांनी सहभाग नोंदविले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT