solapur-news-mahanagarpalika-696x364.jpg 
सोलापूर

हलगी वाजवून जप्ती कारवाई ! 'सिध्देश्‍वर'ने दिला 36 लाखांचा धनादेश

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेची कोट्यवधी रुपयांची कराची थकबाकी थकविणाऱ्यांवर आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार जप्तीची कारवाई केली जात आहे. हलगी वाजवून मालमत्ता जप्त केली जात आहे. संबंधित थकबाकीदारांना त्यांच्याकडील रक्‍कम भरण्यासाठी मुदत देऊनही थकबाकी न भरणाऱ्यांची मालमत्ता आता थेट जप्त केली जात आहे. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह अन्य बड्या थकबाकीदारांची तथा त्यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्त केली जात आहे. या धसक्‍याने श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याने तत्काळ थकबाकीपोटी 36 लाख 21 हजार तीन रुपयांचा धनादेश कर संकलन अधिकारी प्रदिप थडसरे यांच्याकडे सोपविला.

ठळक बाबी... 

  • महापालिकेची थकबाकी न भरणाऱ्यांवर हलगी वाजवून जप्तीची कारवाई 
  • माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार रवि पाटील यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्त 
  • महापालिकेच्या 15 कर निरिक्षकांना आज प्रत्येकी तीन मालमत्ता जप्तीचे दिले उद्दिष्टे 
  • दहा लाखांवरील थकबाकीदारांवर पहिल्या टप्प्यात जप्तीची कारवाई 
  • थकबाकी भरा अन्यथा मालमत्ता जप्त; पदाधिकाऱ्यांसह बड्या थकबाकीदारांवर बडगा 

शहरातील काही मोजक्‍या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. दहा लाखांवरील थकबाकीदारांची सुनावणी महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी घेतली. त्यांना थकबाकी भरण्यासाठी मुदत दिली. त्यांच्याकडील शास्तीची रक्‍कम माफ करीत अभय योजना लागू केली. दुसरीकडे पाच ते दहा लाखांपर्यंत थकबाकी असलेल्यांची सुनावणी उपायुक्‍त जमीर लेंगरेकर यांनी घेतली. त्यांनाही थकबाकी भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुदतीत थकबाकी न भरल्यास त्यांचीही मालमत्ता जप्त केली जाईल, अशी माहिती लेंगरेकर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. महापालिकेअंतर्गत क्षेत्राचा विकास करण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसा नाही. दुसरीकडे बड्या थकबाकीदारांना वारंवार बजावूनही त्यांनी थकबाकी भरलेली नाही. त्यांनी आगामी काही दिवसांत थकबाकी न भरल्यास त्यांची मालमत्ताही जप्त केली जाईल, असा इशारा लेंगरेकर यांनी दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT