2corona_agencies_1.jpg 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचे सहा बळी ! आज 108 पॉझिटिव्ह; 'या' गावांमध्ये सापडले सर्वाधिक रुग्ण 

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 24) नव्या 108 रुग्णांची भर पडली. आता एकूण रुग्णसंख्या दोन हजार 529 झाली असून आज अंकलगी, पितापूर (ता. अक्‍कलकोट), वैरागमधील तिघांचा तर पंढरपुरातील अनिल नगरात राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत बार्शीत 19, अक्‍कलकोटमधील 12, उत्तर व दक्षिण सोलापुरातील प्रत्येकी आठ तर पंढरपुरातील चार, मोहोळमधील सात, तर माढ्यातील तीन आणि करमाळा व सांगोला तालुक्‍यातील प्रत्येकी एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

अक्‍कलकोटमधील जुना तहसिल कार्यालय, म्हैसलगी येथे प्रत्येकी एक, करमाळ्यातील वेताळ पेठ, मधुरा नगरात प्रत्येकी एक, माढा तालुक्‍यातील कुर्डूवाडी, उपळाई खुर्दमध्ये प्रत्येकी दोन, पापणस, रांझणी, रिधोरे येथे प्रत्येकी एक, माळशिरस तालुक्‍यातील बोरगाव, माळशिरस येथे प्रत्येकी एक, मंगळवेढ्यातील सबजेल येथे सात रुग्ण सापडले आहेत. तर मोहोळमधील नागनाथ गल्ली, रोहिदास नगर, देगाव, कोरवली, शेजबाभुळगाव येथे प्रत्येकी एक, आष्टे, पापरीत प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. तर बीबी दारफळमध्ये सात, पंढरपुरातील अनिल नगर, गोविंदपुरा, महावीर नगर, रेल्वे स्थानकाजवळ, स्टेट बॅंकेजवळ, परदेशी नगर, सांगोला रोड, तानाजी चौक, झेंडे गल्ली, लक्ष्मी टाकळी, सरकोली येथे प्रत्येकी एक, गांधी रोड दोन, रोहिदास चौक चार, संभाजी चौक, वाखरीत प्रत्येकी तीन, भंडीशेगाव दोन रुग्णांची भर पडली. दक्षिण सोलापुरातील अंत्रोळी, धोत्री, होनमुर्गी, होटगी, कासेगाव, मंद्रूप, मनगोळीत प्रत्येकी एक, बार्शीतील आडवा रस्त्यावर तीन, दत्त नगरात दोन, लहुजी चौक, पाटील चाळ, राऊत चाळ, गाताचीवाडी, हत्तीज, मालेगाव, मानेगाव, पानगाव, राळेरास, साकत पिंपरी, वैराग येथे प्रत्येकी एक, पाटील प्लॉट दोन, चिंचोलीत आठ, जामगाव सहा, कुसळंब चार, सारोळे व सासुऱ्यात दोन रुग्ण सापडले आहेत. 


तालुकानिहाय रुग्ण 
अक्‍कलकोट 424, बार्शी 614, करमाळा 60, माढा 94, माळशिरस 104, मंगळवेढा 64, मोहोळ 183, उत्तर सोलापूर 210, पंढरपूर 261, सांगोला 31, दक्षिण सोलापूर 484 असे एकूण दोन हजार 529 रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यातील 11 तालुक्‍यात सापडले आहेत.  

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत 19 हजार 77 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट; दोन हजार 529 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह 
  • शुक्रवारी 641 व्यक्‍तींच्या अहवालापैकी 108 व्यक्‍तींचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह 
  • सोलापूर ग्रामीणमधील सहाजणांचा कोरोनाने घेतला बळी; मृतांची संख्या आता 63 झाली 
  • एकूण रुग्णांपैकी 845 रुग्णांनी कोरोनावर मात करीत घर गाठले; एक हजार 621 रुग्णांवर उपचार सुरु 
  • बार्शी तालुका जिल्ह्यात अव्वल; दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट, पंढरपूर अन्‌ उत्तर सोलापुरात सर्वाधिक रुग्ण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Muncher Municipal Result:'मंचर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजश्री गांजाळे'; आमदार शरद सोनवणेंनी फुगडीतून व्यक्त केला आनंद..

राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष! एम.कॉम.चे शिक्षण घेणारी २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे मोहोळच्या नगराध्यक्षा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

Marathwada Sahitya Sammelan: ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे; बीड जिल्ह्यात हाेणार संमेलन!

Nagaradhyaksha Election Poll Results : नगराध्यपदाच्या निकालानंतर अजित पवार गटाच्या नेत्याने टोचले स्वत:च्या पक्षाचे कान; म्हणाले, आत्मचिंतनाची गरज!

SCROLL FOR NEXT