school_test 
सोलापूर

Breaking ! आतापर्यंत 270 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह; अहवाल येईपर्यंत शिक्षकांना वर्गावर जाता येणार नाही

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या एक लाख सहा हजार 491 शाळा आजपासून (ता. 27) सुरू होणार आहेत. पहिल्यांदा 50 टक्के उपस्थिती राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील चार हजार 684 शाळा असून त्याअंतर्गत तीन लाख चार हजार 527 मुले शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित शिक्षकांना कोरोना टेस्ट बंधनकारक केली असून आतापर्यंत 25 टक्‍क्‍यांपर्यंत शिक्षकांचेच अहवाल आले आहेत. त्यात दोनशेहून अधिक शिक्षक बाधित आढळले असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 12 जणांचा समावेश आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्‍यात 520 शिक्षक असून त्यातील 189 जणांचे अहवाल आले आहेत. त्यात एक बाधित आढळला असून करमाळा तालुक्‍यात एक, पंढरपूर तालुक्‍यात तीन, माळशिरस तालुक्‍यात तीन, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील चार शिक्षक बाधित आढळले आहेत. दुसरीकडे सांगोला तालुक्‍यातील 598, माढा तालुक्‍यातील 612, करमाळा तालुक्‍यातील 360, पंढरपूर तालुक्‍यातील 925, सोलापूर शहरातील एक हजार 872, बार्शीतील 988, माळशिरस तालुक्‍यातील 715, अक्कलकोट तालुक्‍यातील 599, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील एक हजार 284, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 429, मोहोळ तालुक्‍यातील 375 जणांची टेस्ट करण्यात आली आहे. 

यापैकी माढा तालुक्‍यातील 612 पैकी 361 जणांचे अहवाल आले आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातील 599 पैकी 280 जणांचे अहवाल आले आहेत. दरम्यान, नववी ते बारावीच्या 22 हजार 204 पैकी राज्यातील 21 हजार 289 शाळा सुरू झाल्या आहेत. त्यात 56 लाख 48 हजार 28 मुलांपैकी 22 लाखांपर्यंत मुले उपस्थित राहू लागले आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील एक हजार 87 शाळांपैकी एक हजार 85 शाळा सुरू झाल्या आहेत. अडीच लाखांपैकी दोन लाख मुले शाळेत येत आहेत. सोलापूर शहर- जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या चार हजार 684 शाळा असून त्यात तीन लाख चार हजार 527 मुले आहेत. त्यापैकी दीड लाख मुले पाहिल्या दिवशी उपस्थित राहतील, असा विश्वास शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी व्यक्त केला आहे. 

शाळा 11 ते 2 वाजेपर्यंत असणार आहे. शाळा सुटल्यानंतर कोणत्याही मुलाला थांबवून ठेवू नये, मुलगा शाळेत आला म्हणजे त्याच्या पालकांची अलिखित संमती आहे, असे समजावे. विनाकारण लेखी संमतीसाठी त्याच्या मागे तगादा लावू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

शिक्षणाधिकारी म्हणाले... 
पाचवी ते आठवीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मात्र, 70 टक्‍क्‍यांहून अधिक शिक्षकांचे कोरोना टेस्ट अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील नऊ हजार 277 पैकी एक हजार 766 शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात 12 शिक्षक बाधित आढळले आहेत. अहवाल येण्यास विलंब लागत असल्याने संबंधित शिक्षकांनी मुलांपासून दूर राहावे, त्यांनी शाळेत प्रवेश करताना तापमान व ऑक्‍सिजन लेव्हल तपासणी करावी आणि मास्क घालणे बंधनकारक असेल, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तर लक्षणे असलेल्या शिक्षकांनी त्यांचा अहवाल येईपर्यंत वर्गावर जाऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

स्थिती कोरोनाची... 

  • सोलापूर जिल्ह्यातील 9 हजार 277 शिक्षकांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत केवळ एक हजार 766 शिक्षकांचेच आले अहवाल 
  • एकूण शिक्षकांपैकी 85 टक्के शिक्षकांचे कोरोना अहवाल आलेच नाहीत 
  • राज्यातील एकूण सव्वादोन लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी 80 टक्के शिक्षकांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत दोनशेहून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह 
  • सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, करमाळा येथील प्रत्येकी एक तर पंढरपूर, माळशिरस तालुक्‍यातील प्रत्येकी तीन आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील चार शिक्षकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT