सोलापूर

रात्री नऊनंतर ५४ मीटर रस्ता निर्मनुष्यच! चोरी, चेन स्नॅचिंग, लुटमारीची भीती; महापालिकेला बसवावे लागणार सीसीटीव्ही अन्‌ लाईट

५४ मीटर रस्त्याच्या सुरवातीपासून रेल्वे बोगद्यापर्यंत लोकवस्ती नाही. या रोडवर सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांची ड्यूटी आहे. पण, रात्री नऊनंतर वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी गरजेच्या ठिकाणी पुरेशी लाइट व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्‍यकता आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मंगळवेढा रस्त्यावरील देगाव हद्दीतील सीएनएस हॉस्पिटलजवळून जुना पूना नाक्याकडे (छत्रपती संभाजी महाराज चौक) जाणारा ५४ मीटर रस्ता आज (शुक्रवारी) वाहतुकीसाठी खुला झाला. पुलाचे काम पूर्ण होऊपर्यंत साधारण वर्षभर याच रस्त्याचा वापर करण्यात येणार आहे. जवळपास पावणेदोन किलोमीटरचा हा रस्ता आहे. ५४ मीटर रस्त्याच्या सुरवातीपासून रेल्वे बोगद्यापर्यंत लोकवस्ती नाही. या रोडवर सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांची ड्यूटी आहे. पण, रात्री नऊनंतर वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी गरजेच्या ठिकाणी पुरेशी लाइट व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्‍यकता आहे.

मंगळवेढ्याकडून येणाऱ्या वाहनांनाही सोलापूर येण्यासाठी ५४ मीटर रस्त्याचा वापर करावा लागत आहे. सध्याचे पर्यायी मार्ग जास्त वापरात नव्हते. अशा निर्मनुष्य पर्यायी रस्त्यांवरून आता वर्षभर २४ तास वाहने ये-जा करतील. या पार्श्वभूमीवर निर्मनुष्य ठिकाणी चोरी, लूटमार (चेन स्नॅचिंग), मारामारी असे गुन्हे होऊ नयेत यासाठी महापालिकेने आवश्यक ठिकाणी पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी पोलिसांनी केली आहे. आता महापालिका प्रशासन या मागणीकडे किती गांभीर्याने पाहणार हे महत्त्वाचे आहे.

‘वाहतूक’चे २५ कर्मचारी पर्यायी रस्त्यांवरच

शहर वाहतुकीच्या दक्षिण विभागाकडे एकूण ९१ वाहतूक अंमलदार आहेत. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकासह महत्त्वाच्या ठिकाणच्या नियमनाची जबाबदारी आहे. पण, आता दमाणी नगर येथील रेल्वे पुलाचे पाडकाम सुरू असल्याने उपलब्ध पर्यायी मार्गांवर २५ ते २७ वाहतूक कर्मचारी नेमले आहेत. पण, पुलाचे काम व्हायला साधारणत: एक वर्ष लागणार असल्याने त्या ठिकाणी महापालिका, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाला देखील मदत करावी लागेल. जेणेकरून पर्यायी मार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहील, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बोर्डाच्या परीक्षेवेळी ‘या’ केंद्रांवर भरारी पथकांचे लक्ष; प्रांताधिकारी, तहसीलदार, शिक्षणाधिकाऱ्यांची पथके; ‘या’ वेळेआधी विद्यार्थ्यांना केंद्रावर पोचावे लागणार

GST Law Amendments : ‘जीएसटी’तील सुखावह बदल

आज मतमोजणी! सोलापूर झेडपीचा निकाल दुपारी ३ वाजेपर्यंत हाती येणार; अक्कलकोट, पंढरपूरच्या सर्वाधिक २४ फेऱ्या, कोणत्या तालुक्याच्या किती फेऱ्या, वाचा...

US tariffs : ‘ट्रम्पअस्त्रा’वरील उतारा

Newgen Software : न्यूजेन सॉफ्टवेअर

SCROLL FOR NEXT