Solapur A young man built a battery powered bicycle  sakal
सोलापूर

सोलापूर : तरुणाने बनवली बॅटरीवर चालणारी सायकल

वसंत कांबळे

कुर्डू : लऊळ ता माढा येथील अकरावीत शिक्षण घेणाऱ्या युवकाने घरातील जुन्याच सायकल मध्ये बदल करुन चार्जिंग ची सायकल बनवली आहे.या बनवलेल्या सायकल ला पाहण्यासाठी व या सायकलची राईड मारण्यासाठी युवकांनी गावात गर्दी केली आहे.निखिल विलास बोडके असे या युवकाचे नाव आहे.

निखिल हा कुर्डूवाडी येथील के.एन.भिसे या महाविद्यालयात कला शाखेतुन शिक्षण घेत आहे. तो शेतकरी कुटुंबातील असुन वडील जणावरांचे व्यापारी आहेत. सध्या पेट्रोल चे भाव गगनाला भिडले आहेत यावर उपाय म्हणून या युवकाने या साध्या च्या लॉकडाऊन मुळे बाजारपेठ थंड आहे. त्यामुळे बाहेर गाडीवर फीरण्यासाठी गाडी लागते .गाडी म्हटले की पेट्रोल आलेच व सध्याच्या गाड्यांचे मायलेज ही कमी असल्याने आडीच रुपये किलोमीटर नुसता पेट्रोल चाच खर्च आला. यावर काही तरी केलं पाहिजे. या उद्देशाने या युवकाने त्याला हायस्कूल साठी आणलेली सायकल अडगळीत पडलेले ली दिसली व त्यामध्ये च बदल करण्यास सुरुवात केली.

त्याने सायकल चा पायडंल काढून त्याठिकाणी बॅटरी वर चालणारी मोटार बसवली आहे. इलेक्ट्रिक साहीत्य बॅटरी ठेवण्यासाठी जून्या गाडीची डिक्की सायकल च्या पाठीमागच्या कॅरेज ला डाव्या बाजूला बसवण्यात आली आहे.स्पिड साठी अक्सीलेटर वायर उजव्या हाताला असणाऱ्या हॅडलल पर्यंत आणली असुन त्याला मोटारसायकल सारखा स्पीड कमी जास्त करता येतो.हॅडलच्या मधोमध लीड ची लाईट बसवली असुन त्यामध्येच चावी लावण्याची सोय आहे.

या सायकल चा स्पीड सुरवातीपासून च जास्त होतो या सायकल वरुन तीव्र असा चढ ही डबल सिट चढला जातो. कमीत कमी शंभर किलो वजन वाहुन नेण्याची क्षमता असल्याचे त्याने सांगितले. गाडीच्या वेगावर ताबा मिळवण्यासाठी तो त्या सायकल ला डिस्क ब्रेक बसवार असल्याचे त्याने सांगितले. पुर्ण क्षमतेने बॅटरी चार्जिंग होण्यासाठी त्याला चार तास चार्जिंग करावं लागत असल्याचे निखिल ने सांगितले. भविष्यात ही अनेक प्रयोग करणार असल्याचे त्याने सांगितले. सध्या या सायकल चा वापर गावातुन शेतात जाण्यासाठी केला जात आहे. यामुळे पैशाची बचत होत असुन पर्यावरण प्रदुषण ही रोखण्यासाठी मदत होत आहे ‌

या निखिल च्या यशस्वी प्रयोगाचे ग्रामस्थांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे. ऐरी वारी निखिल ला कोणी ही न ओळखणारे आत्ता त्यांचे कौतुक करत असुन सद्गुरु वामनराव पै यांचे वाक्य "तुच आहे तुझ्या जिवनाचा शिल्पकार" अल्प वयातच खरे करुन दाखवले असुन सध्याच्या तरुण वर्गा समोर एक आदर्श निर्माण केला आहे.

यासाठी वापरलेलं साहीत्य मोटार 1.5एच,पी. गाडीची चैन,चैन पॉकेट,12होल्ट चार बॅटरी,चार्जिंग स्वॉकेट,ॲक्सीलेटर वायर,चावीस्वॉकेट, एल ई डी हेड लाईट इत्यादी. हे सर्व साहित्य ऑनलाईन मागवले व लोकल गॅरेज मधील साहीत्य वापरले. या साठी त्याला 15000/--रुपये खर्च आल्याचे त्यांने सांगितले. बालाजी खारे,रोहीत लोकरे याचे सहकार्य लाभल्याचे ही सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT