remdisivir 
सोलापूर

रेमडेसिव्हिरच्या तुटवड्याचे खापर सोलापूर प्रशासनाने फोडले रुग्णांच्या माथ्यावर 

प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक अधिक हुशार झाले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लोकांकडे पैसे आले आहेत त्यामुळे रेमेडिसिव्हिर इंजेक्‍शनची मागणी वाढली आहे. तुम्ही कोरोनाबाधित रुग्णाला रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन द्या, हे इंजेक्‍शन उपलब्ध करतो असाच सूर रुग्ण व त्यांचे नातेवाईक लावतात आणि डॉक्‍टर रेमडेसिव्हिरचे प्रिस्क्रिप्शन देतात. त्यामुळेच सोलापूर शहर व जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा तुटवडा निर्माण झाल्याचा अजब दावा सोलापूरच्या प्रशासनाने केला आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच्या तुटवड्याच्या बातम्या मिडियामध्ये ठळकपणे आल्याने सर्वच रुग्ण या इंजेक्‍शनची मागणी करत असल्याचेही अधिकाऱ्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेत ठासून सांगितले. 

सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच्या तुटवड्या संदर्भात माहिती देण्यासाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, डॉ. तोष्णीवाल यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी हा अजब दावा केला आहे. 

डॉ. ठाकूर म्हणाले, कोरोनाबाधित झालेल्या 80 ते 85 टक्के रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची आवश्‍यकता भासत नाही. रेमडेसिव्हिरचा अनावश्‍यक वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम त्या व्यक्तीच्या किडनी व लिव्हरवर होतो. हे इंजेक्‍शन घेण्यासाठी तो व्यक्ती फिट असणे आवश्‍यक आहे. कोरोना बाधित व्यक्तीला ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरळीत झाल्यास बहुतांश रुग्ण रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन शिवाय बरे होऊ शकतात.

सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार आता मेडिकलमधून रेमडेसिव्हिर देणे बंद करण्यात आले आहे. इंजेक्‍शन पुरवठादारांकडून थेट छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाला इंजेक्‍शनचा पुरवठा केला जात आहे. या रुग्णालयाकडून दुसऱ्या रुग्णालयाला रेमडेसिव्हिरचा पुरवठा केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT